BJP and Congress
BJP and Congress 
देश

काही वेळातच गोव्याच्या नविन मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर होणार

अवित बगळे

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पद आणि सत्ता स्थापनेसाठी गोव्यातील काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये रस्सी खेच सुरु झाली आहे. परंतु, पुढील काही वेळातच गोव्याच्या नविन मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्यात येईल असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काल पासून गोव्यात आहेत. आज त्यांची गोव्यातील सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर पुढील काही वेळातच नितीन गडकरी गोव्याच्या नविन मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करतील."

दरम्यान दुपारी काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. गेल्या वर्षभरातील काँग्रेस सरकार स्थापन्याचा सहाव्यांदा दावा करत आहे. 

काँग्रेसने शनिवारी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री त्यांनी राज्यपालांची भेट मागितली होती. आज दुपारी राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली. तत्पूर्वी काँग्रेस विधीमंडळ गटाची बैठक विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. 

विधानसभेत काँग्रेसकडे सर्वाधिक 14 आमदार आहेत. मनोहर पर्रीकर यांच्याच नेतृत्वाला गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी पाठींबा दिला होता. आता पर्रीकर राहिले नसल्याने आणि या पक्षांनी नव्याने पाठींबा न दिल्याने भाजपचे सरकार अल्पमतात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राज्यपालांनी नेहमीप्रमाणे घटनात्मक तरतुदींनुसार कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.

दुसरीकडे भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांच्या नेत्यांशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा चर्चा करणार आहेत. त्यांनी दोन‌ उपमुख्यमंत्रीपदे देण्याची तयारी दर्शवली आहे. मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. परंतु, बहुमतासाठी गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पाठिंब्याच्या पत्राची भाजपला प्रतीक्षा असून दोन्ही पक्षांकडून उपमुख्यमंत्री पदांची मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तीन‌ मंत्रीपदे व महामंडळांच्या तीन अध्यक्षपदांची देखील मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT