GoBackModi hashtag trending on twitter
GoBackModi hashtag trending on twitter  
देश

का होतोय #GoBackModi हॅशटॅग ट्रेंड?

सकाळ डिजिटल टीम

गुमला : झारखंडमधील विधानसभा निवडणूकांना 30 नोव्हेंबरला सुरवात होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. मात्र, मोदी झारखंडमध्ये दाखल होण्यापूर्वीच ट्विटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. हा हॅशटॅग का ट्रेड झाला? काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज झारखंडमधल्या डाल्टनगंज व गुमला येथे सभा होती. विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्यांदाच मोदी झारखंडमध्ये आले होते. मात्र झारखंडमध्ये येण्यापूर्वीच त्यांचे स्वागत #GoBackModi या हॅशटॅगने झाले. झारखंडमधील आदिवासींना मोदी लूटत आहेत, असा गंभीर आरोप नेटकऱ्यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

मोदी सभांना येणार होते, त्यामुळे पुन्हा एकदा मोदी आदिवासींना लुटायला येत आहेत, आम्ही असे होऊन देणार नाही, अशा आशयाची ट्विट्स व्हायरल होत आहेत. तसेच देशातील शेतकरी का आत्महत्या करत आहे, मोदी नेहमीच इतकं खोटं का बोलतात, असे सवाल ट्विटवरून केले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. 

झारखंडमध्ये पाच टप्प्यांत निवडणूका होतील. 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत या निवडणूका होतील व 23 डिसेंबरला या निवडणूकीचा निकाल लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT