Google Doodal
Google Doodal 
देश

Republic Day : Google 'डूडल' च्या देशवासियांना खास पद्धतीने शुभेच्छा

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : Google Doodle Today: भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day २०२२), सर्च इंजिन 'गुगल' ने खास प्रकारे डूडल (Googel Doodle For Republic Day) बनवत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने तयार केलेल्या डूडलमध्ये हत्ती, उंट आणि सॅक्सोफोनसह २६ जानेवारी रोजी राजपथवरील परेडशी (Rajpath) संबंधित अनेक गोष्टींची झलक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या डूडलमध्ये अनेक प्राणी, पक्षी आणि वाद्ये दिसत असून गुगलच्या इंग्रजी स्पेलिंगचा 'ई' तिरंग्याच्या रंगात रंगवण्यात आला आहे. (Google Special Doodle For India)

डूडलमध्ये परेडची (Pared ) मुख्य आकर्षणे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यात 'गुगल'च्या प्रत्येक इंग्रजी अक्षराला वेगळे रूप देण्यात आले आहे. यामध्ये 'G' मध्ये हत्ती, उंट, घोडा आणि कुत्रा दाखवण्यात आला आहे. हे सर्व प्राणी परेडमध्ये दिसतात. तबला 'O' अक्षरात आणि सॅक्सोफोन 'G'मध्ये दखविण्यात आला आहे. ही वाद्ये लष्कराच्या (Army Music Instruments) अनेक तुकड्यांद्वारे परेडमध्ये वापरली जातात. शांततेचे प्रतीक म्हणून दोन पांढरी कबूतर 'L' अक्षराभोवती उडताना दिसत आहेत. त्याचबरोबर 'E' तिरंग्याच्या रंगात (India Flag) रंगवण्यात आला आहे. २०२१ मध्ये, Google ने प्रजासत्ताक दिनानिमित्त डूडलमध्ये भारताचे दोलायमान रंग, कला, संस्कृती, पोशाख आणि वारसा दखविला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT