indian-railway
indian-railway 
देश

रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर ; सरकारने १०९ मार्गांसाठी निविदा मागविल्या 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले असून देशातील १०९ मार्गांवर १५१ आधुनिक रेल्वे गाड्या चालविण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून निविदा /अर्ज मागविण्यात आले आहेत. यातून किमान ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा विश्‍वास रेल्वेला आहे. सर्व नव्या गाड्यांमधील चालक आणि गार्ड हे भारतीय रेल्वेचेच असतील, तसे बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नफ्याचे मार्ग कंपन्यांना? 
प्रस्तावित नव्या गाड्या देशातील कोणकोणत्या मार्गांवर चालविल्या जाणार हे रेल्वेने गुलदस्त्यात ठेवले असले तरी दिल्ली - मुंबई किंवा दिल्ली - लखनौ, दिल्ली - चंदीगड, दिल्ली - अमृतसर यासारख्या घसघशीत उत्पन्न देणाऱ्या प्रवासी मार्गांना प्रस्तावित खाजगी कंपन्यांची पहिली पसंती राहील, हे निश्चित आहे. प्रस्तावित खासगीकरणातील १५१ रेल्वेगाड्यांचे मार्ग निश्चित करताना नफा मिळवून देणारे मार्ग खासगी कंपन्यांच्या घशात जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र खाजगी कंपन्यांना प्रवासी रेल्वेगाड्या चालविण्यास दिल्याने रोजगार वाढेल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील असे रेल्वेतर्फे सांगण्यात येत आहे. या गाड्या ताशी १६० किलोमीटर म्हणजे सध्याच्या शताब्दी - राजधानीपेक्षा कितीतरी जास्त वेगाने धावतील असे रेल्वेने नियोजन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लखनौ-दिल्ली पहिली गाडी 
मागील वर्षी भारतीय रेल्वे खान-पान व पर्यटन महामंडळाच्या (आयआरसीटीसी) माध्यमातून सुरू केलेली लखनौ-दिल्ली तेजस एक्सप्रेस ही संपूर्णपणे खासगी तत्त्वावर चालविली जाणारी देशातली पहिली रेल्वे मानली जाते. त्यापाठोपाठ वाराणसी-इंदूर (काशी-महाकाल एक्सप्रेस), लखनौ- दिल्ली तेजस व अहमदाबाद-मुंबई एक्सप्रेस या तीन गाड्याही आयआरसीटीसीनेच खासगी तत्त्वावर चालविण्यास घेतल्या आहेत. 

३५ वर्षांचे करार होणार 
नव्या खाजगीकरण योजनेनुसार ज्या खासगी उद्योगांना किंवा कंपन्यांना प्रवासी रेल्वे गाड्या चालवण्याची कंत्राटे मिळतील, त्यांच्याशी सुरुवातीला ३५ वर्षांचे करार केले जातील. या कंपन्यांना सुरुवातीलाच रेल्वेकडे लिलाव प्रक्रियेत निश्चित केलेला महसुली खर्च, फिक्स्ड हॉलेज चार्ज, एनर्जी चार्ज हे सारे भरावे लागतील. गाड्या चालविण्याचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार भारतीय रेल्वेकडे असतील. 

नव्या क्लस्टरमध्ये विभागणी 
या नव्या खासगी रेल्वेगाड्यांसाठी देशातील रेल्वे नेटवर्कची १२ क्लस्टरमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. प्रस्तावित १०९ गाड्या याच क्लस्टर मध्ये चालतील त्याबाहेर त्यांना परवानगी नसेल. प्रत्येक गाडी किमान १६ डब्यांची असेल. जी खासगी कंपनी रेल्वे चालविण्यास घेईल, तिलाच संबंधित सर्व मार्गावरील रोलिंग स्टॉक आणि रेल्वेमार्गासह गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करावा लागेल. 

विशेष गाड्यांचे नियोजन 
‘अनलॉक-२’ सुरू झाल्यानंतर रेल्वेने देशभरात आणखी ९० विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. ४५ मार्गांवर दोन्ही बाजूने धावणाऱ्या या गाड्यांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. पुढील आठवड्यापासूनच या गाड्या सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. सध्या रेल्वे २०० विशेष गाड्या चालवीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT