micro and small scale industries
micro and small scale industries sakal media
देश

गुजरातने महाराष्ट्राला टाकलं मागे, उद्योगांसाठी सर्वाधिक पसंती!

ओमकार वाबळे

गुजरातने देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून महाराष्ट्राला मागे टाकले आहे. उद्योगपूरक वातावरणासह नव्याने उदयास येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी गुजरात अनुकूल असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालात समोर आलं आहे.

पूर्वीच्या उत्पादनातील एकूण मूल्यवर्धन (GVA) 2021 या आर्थिक वर्षात आणि 2020 या आर्थिक वर्षात (FY20)सरासरी 15.9 टक्क्यांनी वाढून 5.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही सरासरी आकडेवारी वार्षिक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

या कालावधीत महाराष्ट्राचा वार्षिक विकास दर 7.5 टक्के होता, ज्यामुळे राज्याचा एकूण उत्पादन GVA FY20 मध्ये 4.34 लाख कोटी रुपये झाला. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे सेवा केंद्र म्हणून पुढे जात आहे. राजस्थान, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वात वाईट कामगिरी नोंदवण्यात आली. एकेकाळी या आकडेवारीत ही राज्ये पुढे होती. त्यांचा वार्षिक वाढीचा दर अनुक्रमे 3.8 टक्के, 5.5 टक्के आणि 6.9 टक्के होता.

GVA म्हणजे जीडीपी वजा निव्वळ उत्पादन कर आहे. आणि वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यातील वाढ दर्शवते. सर्वाधिक उत्पादन GVA असलेली इतर राज्ये म्हणजे तामिळनाडू 3.43 लाख कोटी रुपये, कर्नाटक 2.1 लाख कोटी रुपये आणि उत्तर प्रदेश 1.87 लाख कोटी रुपये. भारताचा उत्पादन जीवहीए 2020 या आर्थिक वर्षात सरासरी 9.7 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ही आकडेवारी 16.9 लाख कोटी रुपये आहे.

या कालावधीत गुजरातमधील सर्वाधिक गुंतवणुकीने उत्पादन वाढीमध्ये देशाच्या इतर राज्यांपेक्षा पुढे जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरातमध्ये सकल निश्चित भांडवल निर्मिती (GFCF)मोठ्या प्रमाणात झाली. आणि FY19 दरम्यान एकूण 5.85 लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणूक पाहायला मिळाली. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या पुढे जाऊन 4.07 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

गुजरातने व्यवसाय मंजुरीसाठी सिंगल विंडो सुरू केली. कामगार नियम सुलभ केलं. तसेच प्रोत्साहन योजनांची सुरळीत प्रशासकीय यंत्रणा राबवली.याचा फायदा झाल्याचं केपीएमजीच्या अहवालात अंतर्भूत आहे. यासह महत्त्वाच्या सुधारणांनी राज्यातील व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी योगदान दिले आहे. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी गुजरातमध्ये आकर्षक ठिकाणं असल्याचं आरबीआयने म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid-19: 'तो' पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

HSC Result : बारावीत नापास झालाय? टेन्शन नॉट! हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

Latest Marathi News Live Update: जॅकी श्रॉफचे 'सिंगम अगेन'साठी काश्मीरमध्ये शुटिंग, म्हणाला...

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

SCROLL FOR NEXT