देश

गुजरातमध्ये युपी, बिहारींना मारहाण; मोदींचे मौन

सकाळवृत्तसेवा

पाटना : गुजरात मध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमचे या प्रकरणावर पुर्ण लक्ष असून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले आहे.

गुजरात मधील साबरकांठा येथे 28 सप्टेंबर या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात एक बिहारी मजूराला पोलिसांनी अटक केले होते. या अटकेमुळे स्थानिक संघटनांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर निशाना साधून त्यांना मारहाण, धमक्या देण्यात सुरूवात केली. या भितीमुळे हजारो नागरिकांनी गुजरात मधून पळ काढला.केंद्रीय गृह मंत्रालयाने गुजरात सरकारडे या प्रकरणाच्या अहवालाची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार दोषींची ओळख पटवून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.     

नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातून निवडूण आले आहेत : तेजस्वी यादव
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत म्हणाले, "उत्तर प्रदेश, बिहारच्या नागरिकांना मारणाऱ्यांनी लक्षात घ्याव की पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातून निवडूण आले आहेत. मोदी आपण पंतप्रधान आहात. या प्रकरणावरील तुमचे मौन धोकादायक आहे. तुमच्या राज्यातील लोक इतर राज्यातील लोकांना मारहाण करून हाकलत आहेत. हीच का तुमची टीम इंडीया आणि सबका साथ सबका विकास?"

पोलिस महानिरीक्षक शिवानंद झा म्हणाले, मुख्यत्वे राज्यातील सहा जिल्ह्ये हिंसेमुळे प्रभावीत झाले आहेत. यामध्ये मेहसाणा आणि साबकांठा सर्वात अधिक प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये 42 प्रकरण दाखल करून घेण्यात आली असून 342 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासा दरम्यान आणखी आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता असून त्यांनाही अटक करण्यात येईल. जे भाग प्रभावीत झाले आहेत तिथे राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) च्या 17 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणा..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT