Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

राहुल गांधींना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून गृह मंत्रालयाची नोटीस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे.

भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पाठविलेल्या पत्रावरून गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही नोटीस आल्याने आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राहुल गांधी यांना 15 दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. स्वामी यांनी पत्रात म्हटले आहे, की राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक आहेत.

स्वामी यांनी गृह मंत्रालयाला याविषयी 21 सप्टेंबर 2017 आणि 29 एप्रिल 2019 असे दोनवेळा पत्र लिहिले आहे. अखेर स्वामी यांच्या पत्रावरून गृह मंत्रालयाने नोटीस पाठविली आहे. 2003 मध्ये ब्रिटनमध्ये बॅकओप्स लिमिटेड कंपनीचे रजिस्ट्रेशन झाले होते. या कंपनीचा पत्ता 51, साउथगेट स्ट्रीट, विंचेस्टर, हॅम्पशायर असा आहे. या कंपनीत राहुल गांधी गुंतवणूकदार आणि सचिव होते. तसेच 2005-06 मध्ये भरलेल्या विवरणपत्रात राहुल यांची जन्मतारिख 19-06-1970 आणि नागरिकता ब्रिटीश नमूद केलेली आहे. 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर जोरदार टीका करत म्हटले आहे, की राहुल गांधी जन्मापासून भारतीय नागरिक आहे. त्यांच्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे. निवडणुकीच्या काळात लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून हा खेळ खेळण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT