honorkilling
honorkilling 
देश

बायकोसमोर त्याला मारून टाकलं अन् पोलिस गेले पळून...

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती अहमदाबादेत घडली आहे. एका क्षत्रिय कुटूंबाने दलित तरूणाची हत्या केली आहे. क्षत्रिय मुलीने दलित मुलाशी लग्न केल्याच्या वादातून मुलीच्या कुटूंबियांनी या दलित तरूणाची हत्या केली आहे. 

अहमदाबादपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडल तालुक्यात ही घटना घडली. दलित तरुणानं मुलीच्या कुटूंबियांच्या इच्छेविरूद्ध लग्न केल्यानं संतापलेल्या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलून हत्या केली. धक्कादायक म्हणजे ही मारहाण होत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यानं तिथून पळ काढला. 

23 वर्षीय हरेश सोळंकीला आमच्या मुलीसोबत लग्न करण्याची हिंमत कशी केलीस, असे विचारत मुलीच्या कुटूंबियांनी सुरा भोसकून हरेशची हत्या केली. लग्नामुळे झालेला वाद मिटवण्यासाठी दोघेही उर्मिलाच्या घरी गेले होते. यावेळी सरकारचे अभयम पथही सोबत होते, पण हा प्रकार घडल्यानंतर त्या पोलिस अधिकाऱ्यानेही तेथून पळ काढला. 

आठ महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. हरेश एका कंपनीत चालक म्हणून कामाला होता. उर्मिला काही दिवसांपूर्वीच माहेरी गेली होती, तिला आणायला गेला असता, हरेशची हत्या करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT