देश

...तर कर्नाटकात सरकार स्थापन करणार : येडियुरप्पा

सकाळन्यूजनेटवर्क

बंगळूर : कोणत्याही परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारचे पतन करण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु आघाडी पक्षांच्या मतभेदातून सरकारचे पतन झाल्यास जरूर सरकार स्थापन करू, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

येडियुरप्पा म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत कोणीच आमदार निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत नाहीत. मध्यावधी निवडणूक व्हावी, अशी आमचीसुद्धा इच्छा नाही. परंतु युती सरकारचे पतन झाल्यास सर्वांत मोठा पक्ष म्हणून हात बांधून बसणे शक्‍य आहे का? कॉंग्रेस व जेडीएसमधील संबंध दिवसेदिवस बिघडत आहेत. दोन्ही पक्षांत असंतोष व मतभेद वाढत आहेत. त्यातून सरकारचे पतन होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आम्ही मात्र सरकारचे पतन करण्याच्या भानगडीत पडणार नाही.' 

ते म्हणाले, की 5 जूनला पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाण्यांचा पुरवठा, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा यासह राज्याच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आंदोलन हाती घेण्यात येईल. जिंदाल कंपनीला देण्यात आलेली बळ्ळारी जिल्ह्यातील जमीन परत घेण्यात यावी, कोणत्याही कारणास्तव जमीन देण्यात येऊ नये. यासाठी पक्षाच्या वतीने आंदोलन हाती घेण्याची तयारी सुरू आहे.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT