Amit Shah 
देश

Naxalism: नक्षलवादाच्या समस्येवर तोडग्यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक; CM शिंदे, फडणवीसांचीही हजेरी

नक्षलवादाविरोधात मोठ्या निर्णयाची शक्यता, दिल्लीत शहांनी बोलावली बैठक; CM शिंदे, फडणवीसांचीही हजेरी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील डाव्या विचारांच्या अतेरिकी संघटनांबाबत अर्थात नक्षलवाद्यांच्या समस्येविरोधात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. कारण यासंदर्भात राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशाचे सुरक्षा सल्लागर अजित डोवाल हे देखील उपस्थित आहेत. (Important meeting in Delhi to solve Naxalism issue CM Eknath Shinde Devendra Fadnavis also present)

मुख्यमंत्र्यांची हजेरी

एएनआयच्या वृत्तानुसार, अमित शहा यांनी नक्षलवाद्यांच्या समस्येवर तोडग्यासाठी आढावा बैठक बोलावली असून यामध्ये केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, अश्विनी चौबे, अर्जुन मुंडा आणि देवुसिंह चौहान त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या बैठकीला उपस्थित आहेत. (Latest Marathi News)

तीन राज्यात नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव

त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. या राज्यांमध्ये नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असल्यानं यांनाही या बैठकीला पाचारण करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

तसेच गृहसचिव अजय भला, आयबीचे संचालक तपन देका आणि एनआयए, एसएसबी, बीएसएफ, सीआरपीएफ, एनएसजीचे महासंचालक देखील या बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे त्या राज्यांचे गृहसचिव आणि प्रधान सचिव हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

यापेक्षा अनेक गंभीर प्रश्न

नक्षलवादासंदर्भातील या बैठकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, नाव नक्षलवादाचा आहे पण कारणं वेगळी आहेत. नक्षलवादापेक्षा गंभीर बाब राज्यात सुरू आहे पण तिकडे मुख्यमंत्री जात नाहीत, त्यांना तो आक्रोश दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT