India Germany Submarine Deal Esakal
देश

Submarine Deal: हायटेक पाणबुड्या घेण्यासाठी जर्मनीचीच निवड का? जाणून घ्या सविस्तर

जर्मन तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्यांचा यापूर्वीही भारताला फायदा झाला आहे.

Sudesh

हिंदी महासागरातील चीनच्या वर्चस्वाला आता मोठा धक्का बसणार आहे. कारण, भारत आणि जर्मनीमध्ये 6 पाणबुड्यांसाठी सुमारे 43,000 कोटी रुपयांचा करार होणार आहे. जर्मनीची संरक्षण कंपनी Thyssenkrupp Marine Systems (TKMS) आणि भारत सरकारची Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) या कंपन्यांमध्ये यासंदर्भात बोलणी झाली.

या करारावेळी जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस देखील उपस्थित होते. याच्या एक दिवस आधी म्हणजे 6 जून रोजी पिस्टोरियस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. भारताला जर्मनीकडून पाणबुडी का विकत घ्यायची यामागे काही कारणं आहेत. हिंदी महासागर क्षेत्रातील चीनचा वाढता प्रभाव कमी करणे हे भारतासमोर मोठे आव्हान आहे.

जर्मनीची निवड का?

भारत दीर्घकाळापासून आपल्या नौदलासाठी पाणबुड्या घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या भारतीय नौदलाकडे 16 पाणबुड्या आहेत. मात्र यातील 11 खूप जुन्या आहेत ही चिंतेची बाब आहे. भारताकडे असलेल्या दोन पाणबुड्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आहेत. पाणबुड्या बांधण्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या करारानुसार 6 आधुनिक डिझेल पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत.

यासाठी जर्मनीची सागरी शस्त्रास्त्र कंपनी आपले तंत्रज्ञान भारताला देणार आहे. या सर्व 6 पाणबुड्या (एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन) AIP तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. या तंत्रज्ञानाने बनवलेल्या पाणबुड्या पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपेक्षा सुरक्षित असतात. कारण त्या बराच काळ समुद्राच्या आत राहू शकतात.

अशा पाणबुड्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली राहू शकतात. दुसरीकडे, पारंपरिक पाणबुड्यांना त्यांचे जनरेटर चालवण्यासाठी 2 ते 3 दिवसांत पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. उत्तम सेन्सर्स आणि शस्त्रे ही आधुनिक डिझेल अटॅक पाणबुडीचे वैशिष्ट्ये आहेत.

जर्मन तंत्रज्ञान भरवशाचं

हिंदी महासागरातील चीनची ताकद कमी करण्यासाठी भारताला 6 पाणबुड्यांची गरज आहे. भारताकडे असलेल्या 16 पाणबुड्यांपैकी फक्त 6 पाणबुड्या हायटेक आहेत. तर, 30 वर्षे जुन्या पाणबुड्यांपैकी अनेक निवृत्त देखील झाल्या आहेत. भारताने यापूर्वी 1986 ते 1994 या कालावधीत जर्मनीकडून चार शिशुमार श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी केल्या होत्या. जर्मन तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्या भूतकाळातही भारतासाठी भरवशाच्या राहिल्या आहेत, म्हणूनच भारताला नवीन पाणबुड्यांसाठी जर्मनीशी करार करणं गरजेचं आहे.

रशियाची मदत

शस्त्रास्त्रांसाठी भारत रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ही पाश्चात्य देशांसाठी चिंतेची बाब आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये जर्मन सरकारने भारतासाठी शस्त्रास्त्र निर्यात धोरण शिथिल केले जेणेकरुन दोन्ही देशांदरम्यान शस्त्रास्त्र खरेदीचे करार केले जाऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT