Nirlama_Sitharaman
Nirlama_Sitharaman 
देश

महत्त्वाचा निर्णय! भारत खरेदी करणार 2700 कोटींची शस्त्रास्त्रे 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ले करून कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविण्यासाठी भारताने आता एकामागून एक ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने आज तातडीने 2700 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली. 

बालाकोटमध्ये काल (मंगळवार) पहाटे भारतीय हवाई दलाने 'जैश ए महंमद'च्या प्रशिक्षण तळांवर हल्ला करून त्यांचे कंबरडे मोडले. यामुळे पाकिस्तानला दणका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानांनी आज भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली. 

त्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांची आज बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि 'रॉ', 'आयबी' या गुप्तचर यंत्रणांचे प्रमुखही उपस्थित होते. त्यानंतर संरक्षण साहित्य खरेदीसंदर्भात महत्वाची बैठक झाली. 

या बैठकीमध्ये संरक्षण दलांसाठी 2700 कोटी रुपयांची तातडीची खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. 

अग्नि हे भारताकडील सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. याची मारकक्षमता 5000 किमी एवढी आहे. भारताकडे 4426 रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे 2924 रणगाडे आहेत. भारताकडे 27 युद्धनौका तर पाकिस्तानकडे 11, भारताकडे 2100 तर पाकिस्तानकडे 950 लढाऊ विमाने आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT