देश

कोरोनाचा स्फोट; २४ तासांत आढळले एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण

सकाळन्यूजनेटवर्क

कोराना महामारीच्या दुसऱ्या लाटीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. दररोज वाढणारे कोरोना रुग्ण नवनवे विक्रम करत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं एक लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोना महामारी भारताता आल्यानंतरची ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होती. गतवर्षी एका दिवसातील कोरोना रुग्णांची संख्या 97,894 इथपर्यंत पोहचली होती. मात्र, दुसऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच वेगानं होत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, तामिळनाडू, मध्यप्रदेशसारख्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे. काही तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. 

आरोग्य मंत्रालयानं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत एक लाख ३ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासांत ५३ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे.   देशात कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जणांनी कोरोनावर मात केली. देशभरात सध्या सात लाख ४१ हजार ३० रुग्ण उपचाराधीन आहेत. तर एक लाख ६५  हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झालाय.

देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं तज्ज्ञांन सांगितलं. पुढील काही दिवसांत देशात कोरोना आधिकच आक्रळविक्राळ होईल, असेही काही तज्ज्ञांनी म्हटलेय. महाराष्ट्रात कोरोनाची वेग सर्वाधिक असून देशात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण येथील आहेत. रविवारी महाराष्ट्रात ५७ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी ठाकेर सरकारनं विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT