NDA Meeting esakal
देश

NDA Meeting : एनडीएच्या बैठकीत शिंदे-पवारांना मानाचं स्थान; पंतप्रधानांच्या रांगेत आसन व्यवस्था

संतोष कानडे

नवी दिल्लीः बंगळूरुमध्ये विरोधकांची दोन दिवसीय बैठक संपन्न झाली आहे. दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक संपन्न झाली. एनडीएच्या बैठकीला महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांना मोदींच्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल बोलतांना सांगितलं होतं की, एनडीएमध्ये ३८ पक्षांचा सहभाग आहे. विरोधी गटाकडे ना नीती आहे ना नेता.. त्यामुळे घराणेशाही जपण्यासाठी त्यांचं संघटन सुरु आहे. दुसरीकडे आम्ही देशहितासाठी एकत्र येत असल्याचं नड्डांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, 'एनडीए'च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आसन व्यवस्था असल्याने भाजपला हे नेते किती महत्त्वाचे वाटत आहेत, हे दिसून येतंय.

बंगळूरु येथील विरोधकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना खर्गे म्हणाले की, विरोधकांची पुढची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. त्याच बैठकीत ११ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ती नावं मुंबईत जाहीर करण्यात येतील आणि ही समिती पुढचे निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facebook, Insta बंदचा राग, आंदोलक घरांना लावतायत आग! ५ मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारी

Shreyas Iyer: 'KKR संघांच्या मिटिंगचा भाग असायचो, पण...', श्रेयसने केला मोठा खुलासा; पंजाबबद्दलही स्पष्ट बोलला

बापरे! काजल अग्रवालची पसरली अपघाती निधन? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली, अभिनेत्री सर्वांनाच सुनावलं

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

SCROLL FOR NEXT