army
army 
देश

Hows The Josh : कितीही कायर समजा, आम्ही सज्ज आहोत; भारतीय लष्कराची कविता

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत असतानाच भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनीच पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला. यानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हल्ल्याप्रती थेट उल्लेख न करता एक कविता पोस्ट केली आहे. 

भारतीय लेखक व कवी रामधारी सिंह दिनकर यांची 'क्षमाशील हो रिपु-समक्ष' ही कविता पोस्ट केली आहे. पाकिस्तान भारताला भित्रे समजत असेल तर, तसे अजिबात नाहिये आम्ही पाकिस्तानात घुसून तुम्हाला उध्वस्त करू शकतो, अशा आशयाची कविता ट्विट करत भारतीय लष्कराने #IndianArmy #AlwaysReady असा हॅशटॅग वापरत आम्ही लढण्यासाठी नोहमीच सज्ज आहेत असा इशारा दिला आहे. 

भारतीय लष्कराने ट्विट केलेली कविता: 

भारतीय 'क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।

सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।

दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. यालाच उत्तर देत आज बालाकोट येथे भारतीय वायु सेनेने जैशे महंमदच्या कंट्रोल रूमवर हल्ला केला. या हल्ल्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारतीय लष्कर नेहमीच ट्विट करत जोशपूर्ण कविता शेअर करत असते.

पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफने अशाच प्रकारचे भावनिक ट्विट केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT