Wagha Border
Wagha Border 
देश

पाकमध्ये चुकून गेलेल्या भारतीयाची 7 वर्षांनंतर सुटका

वृत्तसंस्था

लाहोर: सात वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात प्रवेश केलेल्या भारतीय व्यक्तीला आज (सोमवार) वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) सूपुर्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्‍मीरमधील गुलाम कादीर या व्यक्तीने 2012 मध्ये चुकून पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाकिस्तानात अनधिकृतरित्या प्रवेश केल्याबद्दल तेथील न्यायालयाने त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा भोगल्यानंतर त्याची सात वर्षांनंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्याला वाघा सीमेवर बीएसएफच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या महिन्यांत चुकून पाकिस्तानात प्रवेश केलेल्या एका लहान मुलाला सदिच्छा म्हणून परत भारतात पाठविण्यात आले होते, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT