Indian Navy caught drugs worth 12 thousand crores in Arabian Sea
Indian Navy caught drugs worth 12 thousand crores in Arabian Sea  
देश

NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

धनश्री ओतारी

भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई केली आहे. 12 हजार कोटी ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. (Indian Navy caught drugs worth 12 thousand crores in Arabian Sea )

मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधून 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज भारतात आणले जात होते. दरम्यान, माहितीच्या आधारे नौदल आणि एनसीबीने ही खेप गुजरातच्या बंदरात पोहोचण्यापूर्वीच पकडली. यादरम्यान ड्रग्ज माफियालाही अटक करण्यात आली आहे.

नौदल आणि एनसीबीने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अरबी समुद्रात आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली आहे. 2600 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार या ड्रग्सची किंमत 12,000 कोटी रुपये आहे.

2600 किलो ड्रग्जसह पकडलेल्या माफियाला कोचीच्या बंदरात नेण्यात आले, जिथे एनसीबी आणि नौदल पुढील तपास करत आहे. आता या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.

भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटला एक इनपुट मिळाले होते. काही ड्रग माफियांना अरबी समुद्रमार्गे भारताच्या कोणत्याही सागरी किनार्‍यावर अमली पदार्थ पोहोचवायचे आहेत, असे त्यात म्हटले होते. या इनपुटच्या आधारे नौदल आणि एनसीबीने संयुक्त कारवाई करून कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची खेप पकडली.

एकाला अटक

नौदलाच्या जहाजाने (INS TEG F-45) अरबी समुद्र परिसरात कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी एका ड्रग्ज माफियालाही अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT