Indian Railways esakal
देश

मोठी बातमी! 1 जानेवारीपर्यंत हावडा-मुंबई मार्गावरील 14 रेल्वे गाड्या रद्द

सकाळ डिजिटल टीम

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे.

रेल्वेनं (Indian Railways) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. बिलासपूर रेल्वे विभागात (Bilaspur Railway Division) इंटरलॉकिंग (Interlocking) न केल्यामुळं झारखंडमधील (Jharkhand) विविध स्थानकांवरून जाणाऱ्या 14 प्रवासी गाड्या भारतीय रेल्वेनं रद्द केल्या आहेत. हावडा-मुंबई (Howrah-Mumbai) मार्गावर 14 गाड्या चालणार होत्या. मात्र, आता 23 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत त्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळं ख्रिसमस आणि नवीन सणाच्या निमित्तानं मित्र व कुटुंबीयांना भेटू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या मार्गात आता अडथळा निर्माण झालाय.

या गाड्यांमधून हजारो लोक प्रवास करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयामुळं आता प्रवाशांना इतर पर्यायांचा शोध घेणं भाग पडलंय. रद्द झालेल्या बहुतांश गाड्या मुंबईकडं रवाना झाल्याचं कळतंय. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या बिलासपूर रेल्वे विभागात नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळं हा निर्णय घ्यावा लागल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या रेल्वे गाड्यामध्ये ज्या प्रवाशांनी त्यांची जागा बुक केली होती, त्यांना तिकिटाचं संपूर्ण पैसे परत केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस (Howrah-Ahmedabad Express) ही पॅसेंजर ट्रेन म्हणून चालवण्याचा निर्णयही प्रशासनानं घेतलाय. ट्रेन क्रमांक 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान झारसुगुडा (Jharsuguda) ते रायगड (Raigarh) मार्गावर पॅसेंजर ट्रेन म्हणून काम करणार आहे. ही ट्रेन मार्गावरील प्रत्येक लहान-मोठ्या स्थानकावरही थांबरणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : अवजड वाहनांमुळे रस्ते बनले मृत्यूचे सापळे; पुण्यात अडीच वर्षांत २१४ जणांचा मृत्यू, १९२ गंभीर जखमी

भरणीतील चिठ्ठ्यांमधून निघणार OBC आरक्षण! सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Shravan Upvas Benefits: या श्रावणात ‘उपवास’ ठरेल आरोग्यासाठी वरदान! कारणे, फायदे व महत्त्व समजून घ्या

Beed News: अल्पवयीन पंधरा मुलांची थेट विक्रीच; गहूखेलमधील प्रकरणात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची पोलिसांना माहिती

Pune Traffic : चाकण-भोसरी कोंडीबाबत स्वतंत्र बैठक, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT