viral video sakal
देश

Video: इस्त्रीवाल्याचा अनोखा जुगाड! LPG सिलेंडरपासून चक्क इस्त्री करतोय..

या व्हिडीओत एका इस्त्रीवाल्याने असा जुगाड केलाय की व्हिडीओ पाहून लोक कौतुक करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या देशात जुगाडांची काही कमतरता नाही. प्रत्येकदिनी जुगाड दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तर अशातच काही जण असा आगळा वेगळा जुगाड लावतात की बघणारेही थक्क होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका इस्त्रीवाल्याने असा जुगाड केलाय की व्हिडीओ पाहून लोक कौतुक करत आहेत. (Iron man used lpg cylinder to press clothes, jugad video goes viral on social media)

इस्त्रीवाल्याने कोळशाच्या इस्त्रीने कपडे प्रेस केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल तर काही इस्त्रीवाले इलेक्ट्रिक इस्त्री वापरतात. मात्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हा इस्त्रीवाला चक्क एलपीजी सिलेंडर द्वारे इस्त्री करून कपडे प्रेस करताना दिसत आहे. त्याच्या या अनोख्या जुगाडचे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ४२ सेकंदांचा आहे. ज्यामध्ये एक इस्त्रीवाला कपडे प्रेस करण्यासाठी कोळसा किंवा इलेक्ट्रिक इस्त्रीऐवजी एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून हा इस्त्रीवाला या प्रेसचा वापर करत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर gieddee नावाच्या युजरनी शेअर केला असून या जुगाडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT