Radharman Das esakal
देश

बांगलादेश इस्कॉन मंदिर हल्ला प्रकरण: हिंदूंचे रक्षण करा- प्रशासनाची मागणी

बांगलादेश हसीना सरकारकडे मंदिर प्रशासनाची मागणी; म्हणाले,हिंदूंचे रक्षण...

सकाळ डिजिटल टीम

बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाका (Dhaka) येथे काल (ता.१७) इस्कॉन मंदिरात (Iskcon Tempal) घुसून नागरीकांनी हल्ला केला यात तीनजण जखमी झाले. या घटनेनंतर बांगलादेशच्या शेख हसीना सरकारकडे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आणि देशातील अल्पसंख्याक हिंदूंना सुरक्षा देण्याची मागणी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष राधारमण दास (Radharman Das) यांनी केली आहे.

राधा रमण म्हणाले, गुरुपौर्णिमेची तयारी करत असताना अचानक सुमारे २०० लोकांचा जमाव श्री राधाकांता मंदिरात घुसला आणि त्यांनी हल्ला केला. या घटनेत तीन जण जखमी झाले. पोलिस घटनास्थळी पोहचताच हल्लेखोरांनी पळ काढला. हा हल्ला गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेश सरकारने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या काही वर्षांत हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी नवरात्रीच्या दरम्यान काही दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. या हिंसाचारात २ हिंदूंसह ७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही ढाक्यातील इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला होता. काल पुन्हा हल्ला झाल्याने अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. बांगलादेशची एकूण लोकसंख्या १६५ दशलक्ष आहे. यामध्ये हिंदू नागरीकांची संख्या जवळपास ९ टक्के आहे. गेल्या ३ ते ४ वर्षात हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

नेमकी कशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हाजी सैफुल्ला यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक जणांनी जबरदस्तीने मंदिरात घुसून तोडफोड सुरू केली. एवढेच नाही तर जमावाने मंदिरातही लुटमार केली. यादरम्यान मंदिरात उपस्थित असलेल्या काही लोकांनाही मारहाण करण्यात आली, त्यामुळे ते जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Live Update: जोबिन जोसेफ यांची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नवी दिल्ली येथील कार्यालयात 'वैयक्तिक प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT