

Riddhi Thakkar Accident
ESakal
छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-३० वर पुरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्कटोला घाटाजवळ एक भीषण अपघात घडला. बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भीषण रस्ता अपघातात मुंबईतील एका महिला दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. रायपूरहून बस्तरला जाणाऱ्या सुमारे २० दुचाकीस्वारांच्या गटात असलेल्या दिव्यांश ठक्कर यांची मुलगी रिद्धी ठक्कर (२४) हिला समोरून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली.