देश

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

''वेगवेगळ्या देशांनी सुरक्षेच्या प्रकरणांमध्ये एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. एकवेळ देशामध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती की, इस्रायलने दिलेल्या कागदपत्रांना एकतर गायब करावं किंवा गहाळ करावं, असं काहींना वाटत होतं.''

संतोष कानडे

Congress news : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियांका गांधी यांनी अनेकवेळा वडील राजीव गांधींचा उल्लेख केला. एका सभेत त्यांनी म्हटलं की, मला माझ्या वडिलांकडून वारशामध्ये देशभक्ती मिळाली आहे. त्यातच आता सुरक्षेसंबंधीच्या माहितीमधील एक धक्कादायक बाब पुढे आली आहे.

इस्रायलच्या कागदपत्रांमध्ये राजीव गांधींच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. परंतु १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर हे दस्तावेजदेखील गायब झाले.

एक्सपर्टने केलेल्या दाव्यामध्ये म्हटलं की, मागच्या तीन किंवा चार दशकामध्ये इस्रायलने जी काही माहिती सादर केली होती, त्यामध्ये राजीव गांधींशी संबंधित दस्तावेज अत्यंत महत्त्वाचे होते. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या आयुष्याशी निगडीत कागदपत्रं होते. त्यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण गतीने बदललं आणि दस्तावेज गायब झाले.

Usanas फाऊंडेशनच्या वतीने आयोजित एका सेमीनारमध्ये सुरक्षा प्रकरणांचे जाणकार नमित वर्मा यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, वेगवेगळ्या देशांना सुरक्षेच्या प्रकरणांमध्ये एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. एकवेळ देशामध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती की, इस्रायलने दिलेल्या कागदपत्रांना एकतर गायब करावं किंवा गहाळ करावं, अशी वेळ आली होती.

Usanas फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिनव पंड्या यांनी म्हटलं की, नमित वर्मा ग्लोबल जियोपॉलिटिक्स आणि सुरक्षेशी संबंधित प्रकरणांचे जाणकार आहेत. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये सरकारसोबत काम केलं आहे.

वर्मा पुढे म्हणाले, राजीव गांधींशी संबंधित दस्तावेज गायब झाल्यानतंर इस्रायलकडून सातत्याने त्याची दुसरी प्रत मागवली जात होती. वास्तविक इस्रायल या गोष्टीवरही कधी सहमत झाला नाही. या घटनेवरुन अंदाज बांधता येतो की, दोन देशांमध्ये गोपनीय माहितीचं आदान-प्रदान करण्यातही काही राजकीय भूमिका असातत.

एक्स्पर्ट पुढे म्हणाले, त्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की पैसे दिलेले आहते. कथित गॉडमॅनने पैसे दिले आहेत. बॅकचॅनेलच्या माध्यमातून सगळी माहिती मिळाली होती आणि गुप्तचर संस्थेलाही याची माहिती होती. त्यांना सुरक्षा देण्यासंबंधी म्हटलं गेलं होतं तरीही सरकारने असं कोणतंही पाऊल उचललं नव्हतं. अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली. 'लाईव्ह हिंदुस्थान'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT