देश

जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला

वृत्तसंस्था

हैद्राबाद- वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर आज चाकू हल्ला झाला आहे. या हल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. विशाखापट्टणमच्या विमानतळावर त्यांच्यावर अज्ञातांनी हा हल्ला केला आहे.

रेड्डी यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. जगनमोहन रेड्डी हे विशाखापट्टणम विमानतळावरून हैद्राबादला रवाना होत होत होते त्यावेळी हा चाकूहल्ला करण्यात आला. विजयनगरम जिल्ह्यातील पदयात्रेचा कार्यक्रम आटोपून ते माघारी निघाले होते.

चाकूहल्ला करणारा व्यक्ती हा विमानतळाच्या खानावळीत कामाला असल्याची माहिती मिळाली आहे. तो सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत रेड्डी यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT