Prashant Kishor Bihar election 
देश

स्वतः निवडणूक लढविणार नाही; प्रशांत किशोर

प्रशांत किशोर : बिहारमध्ये सरस पर्यायाची प्रतिज्ञा

सकाळ वृत्तसेवा

बेट्टीया : निवडणूक रणनितीकार तसेच कार्यकर्ते प्रशांत किशोर यांनी स्वतः निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्याचवेळी आपल्या बिहार राज्यासाठी सरस पर्याय उभारण्याच्या प्रतिज्ञेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आय-पॅक (इंडियन पोलिटिकल अॅक्शन कमिटी) संघटनेची स्थापना केलेल्या प्रशांत किशोर यांना निवडणूक रिंगणात उतरणार का असा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आला आहे. रविवारी पत्रकार परिषदेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाल्यानंतर, ‘मी निवडणूक का लढवेन,‘ असा प्रतिप्रश्न त्यांनीच केला. आपल्याला अशी कोणतीही आकांक्षा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संयुक्त जनता दलाच्या (जदयू) नेत्यांनी प्रशांत किशोर हे फारशी राजकीय बुद्धिमत्ता नसलेले धंदेबाज आहेत, असा आरोप केला आहे. यास प्रत्यूत्तर देताना त्यांनी प्रतिप्रश्न केला की, ‘असे होते तर मग नितीश कुमार यांनी दोन वर्षे मला राजकीय सल्लागारपदी नेमून त्यांच्या निवासस्थानी का ठेवले होते?‘ ते पुढे म्हणाले की, ‘जदयू नेत्यांना माझ्यावर टीका करायला आवडते. नितीश यांच्या राजकीय उद्योगधंद्यात मी पुन्हा सहभागी झालो तर ते माझ्यावर स्तुतिसुमने उधळतील. मी स्वतःहून वेगळा मार्ग निवडला असल्यामुळे ते आणि त्यांची खुशामत करणे नाराज झाले आहेत.‘

प्रशांत किशोर यांनी पदयात्रा काढली आहे. जनसुराज मोहिमेचे राजकीय पक्षात रूपांतर करायचे का याविषयी ते पश्चिम चंपारण येथे जनमत आजमाणवर आहेत. असे राज्याच्या सर्व जिल्ह्यांत केले जाईल. त्यानुसार पुढील कृती ठरवू, असेही त्यांनी नमूद केले.

नितीश...तेव्हाचे अन्् आताचे...

पूर्वी नितीश यांच्यासह काम केल्याचा पश्चात्ताप होत नसल्याचे स्पष्ट करून प्रशांत किशोर म्हणाले की, ‘दहा वर्षांपूर्वीचे आणि आताचे नितीश यांच्यात जमीन-अस्मानाचा फलक आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी खुर्ची सोडली होती. हेच नितीश आता सत्तेवर राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार आहेत.

...तर पदयात्रा थांबवू

महाआघाडी सरकारने वर्षाकाठी दहा लाख नोकऱ्या पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. याची खिल्ली उडविताना प्रशांत किशोर म्हणाले की, ‘मी अनेकवेळा म्हणालो आहे आणि आता पुन्हा सांगतो की, या सरकारने त्यांच्या आश्वासनाची पुर्तता केली तर मी माझी पदयात्रा थांबवेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT