Crime News
Crime News esakal
देश

Murder Mystery : चुलती-पुतण्याचे अनैतिक संबंध अन् हायवेवर मृतदेह; धक्कादायक घटनेने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

Jharkhand News : चुलता आणि चुलतीचा घटस्फोट झाल्यानंतर पुतण्याने चुलतीशी अनैतिक संबंध ठेवले. मात्र हे प्रकरण पुढे खूनापर्यंत जावून पोहोचलं. या घटनेने संपूर्ण झारखंडमध्ये खळबळ उडाली होती. देशभर गाजलेलं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे.

चार वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील पोलिसांना एक माहिती मिळते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ७५ वर एक मृतदेह पोलिसांना सापडतो. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात वाटतो. त्यादृष्टीने मृत्यूची नोंदही केली जाते.

त्यानंतर पोलिस महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवतात. मृत महिलेचं वय २३ वर्षे होतं. तिचा काही दिवसांपूर्वी घटस्फोटही झालेला होता. परंतु अपघातावर घरच्यांचा अजिबात विश्वास नव्हता. मृत महिलेच्या कुटुंबातील लोक आणि गावकरी पोलिस ठाण्यात ठाण मांडतात. नाईलाजाने पोलिसांना एफआयआर दाखल करावा लागतो.

पुढे पोलिसांच्या विशेष पथकाने प्रकरणाचा तपास सुरु केला. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत महिलेल्या डोक्याला मार लागल्याचं पोलिसांना समजलेलं होतं. पोलिस मृत महिलेच्या घराची तपासणी करतात. तिथे पोलिसांना एक सिम कार्ड सापडतं.

सापडलेल्या सिम कार्डचा सीडीआर पोलिस मिळवतात आणि धक्काच बसतो. हे सिमकार्ड मृत महिलेचं नव्हतंच. ते त्या महिलेच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या पुतण्याचं होतं. सद्दाम अन्सारी असं त्या पुतण्याचं नाव.

२५ वर्षीय सद्दाम हा खपरो गावचा आहे. पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी सुरु केली. सद्दामने सांगितलं की, त्याचा चुलता हबीबउल्ला याच्याशी मृत महिलेचं लग्न झालं होतं. परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंlर सद्दामने चुलतीला ती आवडत असल्याचं सांगितलं.

सुरुवातीला तिने त्याला फार गांभीर्याने घेतलं नाही. परंतु नंतर तिचंही त्याच्यावर मन जडलं. नात्यातल्या मर्यादा विसरुन दोघांनी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. मात्र चुलती सद्दामवर लग्नासाठी दबाव आणू लागली. त्यामुळे तो त्रस्त झाला.

सद्दामने एक दिवस लग्नाचा बहाणा करुन चुलतीला बोलावून घेतलं. तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन तिचा खून केला. मृतदेह रस्त्यावर फेकून अपघाताचा बनाव केला. प्रकरणाच्या तपासानंतर सद्दावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT