देश

काँग्रेसच्या धडाडत्या तोफेचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव

वृत्तसंस्था

जिंद : काँग्रेसचे स्टार प्रचारक रणदीप सुरजेवाला यांचा जिंदमधून दारूण पराभव झाला आहे. हरियानातील जिंद आणि राजस्थानमधील रामगड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. जिंदमधून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचा पराभव झाला असून जिंद मतदारसंघात जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) दिग्विजय चौटाला आणि भाजपचे कृष्ण मिड्‌ढा यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार कृष्ण मिड्‌ढा हे विजयी झाले आहेत.

रणदीप सुरजेवाला या निवडणुकीत तिसऱया स्थानावार फेकले गेले. सुरवातीच्या मतमोजणीत जिंदमध्ये काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला चौथ्या क्रमांकावर तर दिग्विजय चौटाला हे आघाडीवर होते. रणदीप सुरजेवाला हे या मतदारसंघातू लढत असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठी बनली होती. परंतु सुरजेवाला यांचा यामध्ये दारूण पराभव झाला आहे.

सकाळी आठ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरवात झाली. 21 उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. हरियानातील जिंद विधानसभेच्या एका जागेसाठी 28 जानेवारी रोजी 75.77 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला हे खूपच मागे पडलेले दिसून आले खरी लढत जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) दिग्विजय चौटाला आणि भाजपमध्ये झालेली दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT