bjp
bjp 
देश

हरियानात युती सरकार; भाजप, 'जेजेपी' सत्तेसाठी एकत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : हरियानात बहुमतापासून सहा जागा दूर असलेल्या भाजपला अखेर दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टी म्हणजे जेजेपीच्या दहा आमदारांची साथ मिळाली आहे. हरियानाच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुख्यमंत्री हा भाजपचा तर उपमुख्यमंत्री "जेजेपी'चा असेल, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज रात्री उशिरा जाहीर केले. 

शहा यांच्या दिल्लीतील घरी झालेल्या बैठकीस मनोहरलाल खट्टर, "जेजेपी'चे सर्वेसर्वा दुष्यंत चौताला, अनिल जैन आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीतच आघाडीचा निर्णय घेण्यात आला. हरियानात 40 जागा मिळालेल्या भाजपला सत्तेसाठी असलेले सहा आमदारांचे बळ याआधीच मिळाले आहे. आता चौताला यांच्या पक्षाच्या दहा आमदारांचा अतिरिक्त बूस्टर डोस मिळाल्याने पक्षश्रेष्ठींना एकएका बंडखोराची मनधरणी करण्याची गरज भासणार नाही. भाजप आणि सर्व मित्रपक्ष मिळून हरियानात सत्तारूढ आघाडीचे बळ 57 एवढे झाले आहे. 

चौताला यांनी आज तुरुंगातील त्यांचे आपले वडील अजय चौताला यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्थिर व सक्षम सरकार राज्याच्या विकासासाठी आवश्‍यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राजकारणात आपण कोणालाही अस्पृश्‍य मानत नसल्याचे सांगून त्यांनी भाजपसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले होते. दुष्यंत यांनी किमान समान कार्यक्रमाचा आग्रह धरताना स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा मागण्या पुढे रेटल्या आहेत. दुष्यंत यांनी उपमुख्यमंत्रिपदासह किमान तीन मंत्रिपदे मागितली होती, त्यांची ही मागणी भाजपने मान्य केली. 

कांडा यांचा पाठिंबा 
भाजपला सात अपक्ष आमदारांनी दुपारपर्यंत पाठिंबा दिला होता. बलात्कार व दुहेरी खुनाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व सिरसाचे आमदार गोपाल कांडा हेही या कठीण समयी पक्षाच्या मागे उभे राहिले आहेत. याशिवाय नयनपाल रावत, रणधीरसिंह गोलन, धर्मपाल गोंडर, बलराज कुंडू, सोमवीर या अपक्ष आमदारांनी व अकाली दलाच्या दोन्ही आमदारांनी भाजपकडे स्पष्ट कल दाखविल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते होते. 

राज्यपालांशी संपर्क 
मनोहरलाल खट्टर यांनी आज सकाळी अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केली. काही अपक्ष आमदारांनीही नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. ज्या अपक्षांनी नड्डांशी चर्चा केली, त्यातील तिघे तर भाजपचेच बंडखोर आमदार आहेत. यानंतर खट्टर यांनी सांगितले की, ""हरियानात आम्ही (भाजप) सत्ता स्थापन करत आहोत. बहुमताबाबत आम्ही आशावादी आहोत.'' सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसताच खट्टर यांनी दिल्लीतूनच चंडीगडच्या राज्यपाल कार्यालयाशी संपर्क साधून उद्याची वेळ मागून घेतली. 

चंडीगडमध्ये बैठक 
भाजपचे हरियाना प्रभारी अनिल जैन यांनी सांगितले, ""चंडीगडमध्ये उद्या (ता. 26) सकाळी अकरा वाजता भाजप आमदारांची बैठक होईल व नवा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल. दिल्लीतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन व सरचिटणीस अरुण सिंह या बैठकीला उपस्थित राहतील. उद्याच्या बैठकीत दिल्लीश्‍वरांचा आशीर्वाद लाभलेले खट्टर यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार हेही निश्‍चित आहे. त्यानंतर खट्टर राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील व उद्या सायंकाळीच त्यांचा शपथविधी होण्याची चिन्हे आहेत. 

चौतालाच फायदेशीर? 
"जेजेपी'चे दुष्यंत चौताला यांचा पाठिंबा मिळाल्याने दहा आमदारांचा बूस्टर डोस पक्षाला मिळेल. एकेका अपक्ष आमदाराला पाच वर्षे सांभाळत बसण्यापेक्षा चौताला यांचा भक्कम टेकू मिळाला तर भाजप नेतृत्वाला तो हवाच होता. त्यामुळेच शहा खास चौतालांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत परतले होते. चौताला यांची मुख्य मागणी उपमुख्यमंत्रिपदाची होती. कॉंग्रेसने त्यांच्यासाठी गालिचे अंथरले असले तरी चौताला यांनी आपल्यासाठी कोणीही अस्पृश्‍य नसून हरियानाच्या विकासासाठी स्पष्ट व निर्णायक सरकार देणाऱ्या पक्षाला आपण साथ देऊ, असे संकेत देऊन केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजपकडे अंगुलीनिर्देश केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT