Justice Ranjan Gogoi sworn in as 46th Chief Justice of India
Justice Ranjan Gogoi sworn in as 46th Chief Justice of India 
देश

रंजन गोगोई देशाचे 46 वे सरन्यायाधीश

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली आहे. आज (ता.03) त्यांनी सरन्याधीशपदाची शपथ घेतली. गोगोई यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहे. माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले होते.

दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ संपला असून बुधवार रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगोई यांचा कार्यकाल नोव्हेंबर 2019 पर्यंत असून त्यांना एकूण 13 महिन्यांचा कार्यकाळ असणार आहे.

न्या. रंजन गोगोई यांची बहुतांश कारकिर्द गुवाहाटी उच्च न्यायालयात गेली. त्यांची 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर 2010 मध्ये त्यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. 23 एप्रिल 2012 पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT