Karamveer Sunita Krishnan talks about victims of child trafficking leaves Big B shocked
Karamveer Sunita Krishnan talks about victims of child trafficking leaves Big B shocked 
देश

KBC Video: 'त्यावेळी माझ्यावर आठ जणांनी बलात्कार केला'

वृत्तसंस्था

मुंबई, 18 ऑक्टोबर : 'मी जेव्हा 15 वर्षांची होते त्यावेळी माझ्यावर 8 लोकांनी बलात्कार केला होता, असा खुलासा कौन बनेगा करोडपती (केबीसी) या कार्यक्रमामध्ये केल्यानंतर प्रेक्षकांसोबतच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला. संबंधित व्हिडिओ 'सोनी' टीव्हीने त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

सामाजिक कार्यकर्ता सुनिता कृष्णन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक घटनांचा खुलासा केला. सोनी टीव्हीने सुनिता कृष्णन यांचे 2 प्रोमो शेअर केले आहेत. ज्यात सुनिता त्यांच्या जीवनातील अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये त्या सांगतात, 'मी जेव्हा 15 वर्षांची होते त्यावेळी माझ्यावर 8 लोकांनी बलात्कार केला होता.' हे ऐकल्यावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसोबतच अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला. दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी चाइल्ड ट्राफिकिंग आणि वेश्यावृत्तीमध्ये फसलेल्या महिलांना वाचवताना आलेले अनुभव सांगितले.

अमिताभ यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले, 'सुनिता यांनी आतापर्यंत 22 हजार पेक्षा जास्त महिला आणि मुलींची रेस्क्यू ऑपरेशन केली आहेत.' सुनिता सांगतात, 'मी एका साडेतीन वर्षाच्या मुलीला वेश्यालयातून बाहेर काढले आहे. माझ्यावर आतापर्यंत 17 वेळा हल्ले झाले आहेत. पण मला मरणाची भीती वाटत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी या मुलींचं रक्षण करत राहणार आहे.'

सुनिता या प्रज्जवला या NGOच्या मुख्य अधिकारी आणि सह-संस्थापिका आहेत. हे एनजीओ यौन तस्करीची शिकार झालेल्या महिला आणि मुलींना वाचवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करते. सुनिता यांना त्यांच्या या कामासाठी 2016 मध्ये देशातील चौथा सर्वोत्तम नागरी पुरस्कार 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT