देश

कर्नाटक राजकारण; जारकीहोळी, कुमठळ्ळींसह चौघांवर कारवाई

वृत्तसंस्था

बंगळूर : पक्षादेश जारी करूनही सातत्यांने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली. 

अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधानसभेच्या संमेलन सभागृहात झाली. सिद्धरामय्या म्हणाले, की रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यांच्या कलम 10 अंतर्गत आमदारपदावरून अपात्र ठरविण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या चौघांनाही अनेक वेळा संधी देण्यात आली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीलाही हे आमदार उपस्थित राहिले नव्हते. आजच्या बैठीकीलाही ते अनुपस्थित राहिले. शिवाय विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांनी भाग घेतलेला नाही. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या व्हिपचेही त्यानी उल्लंघन केले आहे. 

या चौघांनीही 15 फेब्रुवारीपर्यंत विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेता येत नसल्याचे कळविले आहे. तिघा जणांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थिती आवश्‍यक नसल्याचे पत्रात म्हटले आहे, तर रमेश जारकीहोळी यांनी मुलाच्या लग्नामुळे हजर राहता येत नसल्याचे सांगितले आहे, असे ते म्हणाले. 

18 जानेवारीच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल चौघांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यांनी त्याला दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने प्रत्यक्ष भेट घेऊन स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. परंतु कोणीच आजवर भेट घेऊन स्पष्टीकरण दिलेले नाही. 

आजच्या बैठकीला रोशन बेग, बी. सी. पाटील, जे. एन. गणेश आले नव्हते. रोशन बेग यांनी दिल्लीतील अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात भाग घेणार असल्याने उपस्थित राहता येत नसल्याचे कळविले आहे. बी. सी. पाटील यांनी शहराबाहेर असल्याने बैठकीला उपस्थित राहता येत नाही, सायंकाळी तुमची भेट घेईन असे कळविले असल्याचे ते म्हणाले. गणेश कोठे आहेत माहीत नाही. त्यांचा फोनवरही संपर्क होत नाही, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT