Kashmiri Kali will Fly in Sky first woman pilot in the state
Kashmiri Kali will Fly in Sky first woman pilot in the state 
देश

"काश्‍मीर की कली' उडणार आकाशी ; राज्यातील पहिली महिला वैमानिक ठरणार

वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्‍मीरमधील इरम हबीब ही राज्यातील पहिली व्यावसायिक वैमानिक ठरणार आहे. अमेरिकेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देशातील दोन विमान कंपन्यांकडून तिला नोकरीसाठी पाचारण करण्यात आले. आता भारतातील वैमानिकाचा परवाना मिळविण्यासाठी इरम दिल्लीत प्रशिक्षण घेत आहे. 

इरमने डेहराडूनहून वन अभ्यासक्रमातील पदवी घेतली असून, शेर-ए- काश्‍मीर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पीएच.डीचा अभ्यास अर्धवट सोडून वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेतील मियामी येथील विमान उड्डाण केंद्रात दाखल झाली. तिने अमेरिका व कॅनेडाचे व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळविलेला आहे. इरमला भारतातच राहायचे असल्याने ती 2016 मध्ये स्वदेशी परतली.

भारतात वैमानिकाचा परवाना मिळविण्यासाठी तिने दिल्लीत प्रशिक्षणाला सुरवात केली आहे. विमान उड्डाणाचा 260 तासांचा अनुभव इरमला आहे. बहारिनमध्ये "एअरबस 320'चे उड्डाण करण्याचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. 

आईवडिलांच्या परवानगीसाठी सहा वर्षे 

बारावीत शिकत असतानाच वैमानिक बनण्याचे स्वप्न इरम पाहत होती. तिने आईवडिलांनाही याबाबत सांगितले होते. मात्र त्यांचा विरोध होता. त्यांचा रुकार मिळविण्यासाठी ती सहा वर्षे सतत प्रयत्न करीत होती. आता त्यांनी वैमानिक मुलीचा अभिमान वाटत आहे. इरमचे वडील हबीबुल्ला जारगर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याचे काम करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT