Kejriwal And K. Kavita
Kejriwal And K. Kavita esakal
देश

Kejriwal And K. Kavita : केजरीवाल, के. कविता यांच्या कोठडीत ७ मेपर्यंत वाढ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीआरएसच्या नेत्या के. कविता तसेच अन्य आरोपी चनप्रीत सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, तिहार तुरुंगात पहिल्यांदाच केजरीवाल यांना इन्शुलिन देण्यात आले आहे.

सक्तवसुली संचलनालयाने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. या अटकेला केजरीवाल यांनी राउज अव्हेन्यू न्यायालयात आव्हान दिले आहे. केजरीवाल यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यांची कोठडी ७ मे पर्यंत वाढवली. या प्रकरणातील आरोपी बीआरएस नेत्या के. कविता यांना दिलासा देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तिहार तुरुंगात इन्शुलिन दिले जात नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केल्याच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना पहिल्यांदाच इन्शुलिन देण्यात आले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण ३२० च्या वर पोचले होते, अशी माहिती आप सूत्रांकडून देण्यात आली. जास्त गरज असेल तरच इन्शुलिन दिले जावे, असा सल्ला एम्स रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी रात्री केजरीवाल यांना इन्शुलिन देण्यात आले. इन्शुलिन देण्याच्या मुद्द्यावरुन आप आणि भाजप आमनेसामने आले होते. आप कार्यकर्त्यांनी इन्शुलिन हातात घेत तुरुंगासमोर निदर्शने केली होती. केजरीवाल यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप आप नेत्यांकडून करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT