Liquor Policy Scam
Liquor Policy Scam sakal
देश

Liquor Policy Scam : केजरीवालांचा ‘पीए’ बडतर्फ ; दक्षता विभागाची कारवाई,विभव कुमारांची सेवा संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नसताना आता दक्षता विभागाने केजरीवाल यांचे स्वीय साहाय्यक विभव कुमार यांची सरकारी सेवा संपुष्टात आणली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल सध्या तुरुंगात असल्याने ‘आप’ चे इतर नेते प्रचाराची धुरा सांभाळत असताना मद्यधोरण प्रकरणी दररोज घडामोडी घडत अाहेत. त्यामुळे आपसमोरील अडचणी वाढत आहेत. या प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने काही दिवसांपूर्वी विभव कुमार यांची चौकशी केली होती. विभव कुमार यांनी सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत चार वेळा आपल्या मोबाईलचा ‘आयएमईआय’ क्रमांक बदलल्याचे ईडीचे म्हणणे होते. यानंतर दक्षता विभागाने विभव कुमार यांची नियुक्ती रद्दबातल ठरविली आहे.

काल दक्षता विभागाच्या विशेष सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर यांनी २००७ मधील प्रलंबित खटल्याचा दाखला देत हा आदेश जारी केला. बिभव कुमार यांची नियुक्ती बेकायदा आणि अवैध असून केंद्रीय नागरी सेवा नियमांचे उल्लंघन करून बिभव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमध्ये विहित प्रक्रियेचे आणि नियमांचे प्रामाणिकपणे पालन झालेले नाही. त्यामुळे बिभव कुमार यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे, असे आदेशात म्हणले आहे.

‘आप’ची प्रचारमोहीम सुरू

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या मुद्द्यावर आप नेत्यांनी दिल्लीमध्ये आक्रमकपणे प्रचार सुरू केला आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी, राज्यसभा खासदार संजयसिंह यांनी प्रचार केला.

राजधानी दिल्लीच्या गोविंदपुरी भागामध्ये प्रचार करताना केजरीवाल यांना खोट्या आरोपांखाली सरकारने अटक केल्याचा दावा अापच्या नेत्यांनी केला. मोफत वीज, पाणी, शिक्षण चांगली आरोग्य सेवा दिल्यामुळे त्यांना अटक झाली असून, भाजपविरोधात जनता लोकसभा निवडणुकीत आपला राग व्यक्त करेल, असा विश्वास आतिशी यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT