maharashtra
maharashtra 
देश

Kerala Floods: गिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात रवाना

सकाळवृत्तसेवा

मुंबई : केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख रक्कम पुरवली जात आहे. महाराष्ट्राकडूनही मदत पुरवली जात असतानाच आज (ता. 20) जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे 81 डॉक्टरांच्या पथकासह त्रिवेंद्रमला रवाना झाले आहेत. हवाई दल व 81 डॉक्टरांच्या तुकडीसह महाराष्ट्राकडून केरळला मदत पुरवण्यात आली आहे. 

केरळमध्ये लष्कराचे बचावकार्य जोरात सुरू असून, अनेक बेघर नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच पेटीएम व अॅमेझॉनवरून वस्तू व पैशांची मदत मागण्यात आली आहे. देशभरातून, तसेच काही इतर देशातूनही केरळ पूरग्रस्तांना मदत पुरवली जात आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व जे. जे. हॉस्पिटलचे डीन डॉ. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली 81 डॉक्टरांचे पथक हे हवाई दलाच्या विमानाने केरळमधील त्रिवेंद्रमला जाण्यासाठी निघाले आहेत. कपडे व औषध सामग्रीसह हे पथक केरळात रवाना होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT