Lakhs of Currency in only ten thousand
Lakhs of Currency in only ten thousand 
देश

लाखांच्या  नोटा फक्त दहा हजारात; पं. बंगाल कनेक्शन

सकाळवृत्तसेवा

सांगली : बनावट नोटा प्रकरणी शहर पोलिसांच्या हाती आणखी दोघेजण लागले असून त्यांना पश्‍चिम बंगालमधून बनावट नोटा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. दहा हजारांच्या बदल्यात एक लाखांच्या बनावट नोटा मिळत असल्याचा धक्कादायक प्रकारही तपासात उघडकीस आला आहे. शहर पोलिसांच्या पथकाने टोळीकडून दोन हजाराच्या तब्बल 123 नोटा हस्तगत केल्या आहेत. 

सुरज उर्फ मनिष मल्ला ठाकुरी (36, अर्जुनवाडी, धनसाली गाव, नवी मुंबई) व जिलानी आशपाक शेख (47, एरोली सेक्‍टर 1, नवी मुंबई) यांना काल मुंबईत छापा टाकून अटक करण्यात आली. याप्रकरणात राजकुमार उज्जेनलाल सिंह (वय 28, कल्याण, ठाणे), प्रेमविष्णू रोगा राफा (वय 26, काटेमानेवली, कल्याण) आणि नरेंद्र आशापाल ठाकूर (वय 33, आनंदवाडी, कल्याण) आधीपासून अटकेत आहेत. 

सांगली बसस्थानक जवळील एका दुकानात खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर तेथे दोन हजाराची बनावट नोट दिली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी राज सिंह याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर राफा, ठाकूर यांना अटक केली. त्यांच्याकडूनही नोटांचे पश्‍चिम बंगाल कनेक्‍शन समोर आले आहे. टोळीतील अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईत गेले. तेथून सूरज ठाकुरी आणि जिलानी शेख यांना ताब्यात घेतले. 

टोळीतील जिलानी शेख आणि प्रेमविष्णू राफा यांची ओळख आहे. जिलानी हा पश्‍चिम बंगालमधून बनावट नोटा आणत होता. जिलानी आणि राफा त्या नोटा खपवत होते. तीन वर्षांपासून त्यांचा हा उद्योग असल्याचे समोर आहे. त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सुमारे 25 ते 30 लाखांच्या बनावट नोटा खपवल्याचे चित्र समोर आले आहे. त्यांच्याकडून मोठी माहिती समोर येण्याची शक्‍यता आहे. 

अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, निरीक्षक रवींद्र शेळके, सहायक निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस नाईक बिरोबा नरळे, हवालदार सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण, रमेश जाधव, सायबरचे अमोल क्षीरसागर यांचा पथकात समावेश आहे. 

त्यांना तीनशे रूपये...

टोळीतील सुरज ठाकुरी, राज सिंह, नरेंद्र ठाकूर या तिघांना दोन हजाराची नोट खपवल्यानंतर तिनशे रूपये व जेवण मिळायचे. ठाकुरी याचा धनसाली गावात चायनिजचे दुकान आहे. राज सिंह मजुरी करतो, तर नरेंद्र ठाकूर हा हमाली करतो. राज्यातील विविध ठिकाणी जावून वस्तु खरेदी करतांना ही बनावट नोट खपवली जात होती. 

राफा मेघालयातील

राफा हा टोळीचा म्होरक्‍या आहे. राफाचे वडिल मेघालयातील आणि आई उत्तर प्रदेशमधील आहे. त्याचा जन्म मेघालय येथे झाला. त्यानंतर तो काटेमानेवली येथे इंग्रजी माध्यमातून शिकला. त्यांची पत्नी पश्‍चिम बंगालमधील आहे. त्यामुळे जिलानी याची ओळक झाली. ते दोघे तीन वर्षांपासून हा धंदा करतात. राफा याच्यावर यापूर्वी नाशिकमध्ये बनावट नोटाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. राफा याचे तीन बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड व विविध बँकांचे एटीएम कार्डही जप्त करण्यात आले आहेत.

राज्यात लाखोंच्या बनावट नोटा

या टोळीसह आणखी काही टोळ्या सक्रीय आहेत. बनावट नोटांचा पश्‍चिम बंगाल कनेक्‍शन वेळोवेळी उघड झाले आहे. मात्र, या टोळीने दोन हजाराच्या नोटा नुकत्याच चलनात आल्याचा फायदा घेत राज्याभरात लाखोंचा बनावट नोटा पसरवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मोबाइल लोकेशनवरून छापा

राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो कोणतीही माहिती पोलिसांना देत नव्हता. टोळीतील साथीदारांचा शोध घेणे महत्वाचे असल्याने पोलिसांनी सायबर शाखेतून मोबाइल लोकेशनवरून अटक केली. नरेंद्र ठाकूर याला कल्याणमधून, तर राफा याला विजापूर (कर्नाटक)मधून अटक करण्यात आली.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT