Letter against us is fake : Sudha Bhardwaj
Letter against us is fake : Sudha Bhardwaj 
देश

आमच्याविरुद्धची पत्रे बनावट : सुधा भारद्वाज 

पीटीआय

नवी दिल्ली (पीटीआय) : कोरेगाव भीमाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या सुधा भारद्वाज यांनी ज्या पत्राच्या आधारे पुणे पोलिसांनी आमच्यावर आरोप केले आहेत, ते बनावट असल्याचे म्हटले आहे. बनावट पत्राच्या आधारे मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकिलांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मी कोणालाही पन्नास हजार रुपये दिलेले नाहीत किंवा कोणा कॉम्रेड प्रकाश यांनाही ओळखत नाही, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. त्यांनी पोलिसांवर मानवाधिकारासाठी काम करणारे वकील, तसेच संस्थांना बदनाम करणे आणि त्यांच्या कामात अडथळे आणले जात असल्याचाही आरोप केला. 

माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याच्या संशयाखाली अटक कामगार संघटनेच्या कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांनी यापूर्वीही मानवाधिकार भंगाविरुद्ध बोलणारे आणि दलित तसेच आदिवासींसाठी लढणाऱ्या लोकांना सध्याचे सरकार लक्ष्य बनवीत असल्याचा आरोप केला होता. 

"पोलिसांचा आरोप नवा नाही' 
हैदराबाद : अटक केलेल्या कार्यकर्त्यांचे माओवाद्यांशी संबंध असल्यासंबंधी महाराष्ट्र पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये नवीन काहीच नाही. जूनमध्येच हे सर्व सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने 6 सप्टेंबरला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले असताना अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेणे बेकायदा आहे, असे नजरकैदेत ठेवण्यात आलेले तेलुगु कवी वरवरा राव यांचे पुतणे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT