lockdown News
lockdown News Google file photo
देश

‘वीकेंड लॉकडाउन’ हटवण्यास नकार; सरकारची शिफारस राज्यपालांनी फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घसरण व पॉझिटिव्हीटी दरातील घट पाहता साप्ताहिक संचारबंदी (वीकेंड लॉकडाउन) मागे घ्यावे, अशी शिफारस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे आज केली. मात्र बैजल यांनी ती फेटाळताना, इतक्यात निर्बंध हटविण्याची घाई नको, परिस्थिती आणखी सुधारू द्या‘, असा सल्ला दिला आहे. (Delhi Corona Updates)

बैजल यांनी विकएंड लॉकडाउन उठविण्याची मुख्यमंत्री केजरीवाल यांची शिफारस तत्काळ फेटाळली. ते म्हणाले, की नव्या रूग्णसंख्येचा वेग व वाढलेला पॉझिटिव्हीटी दर जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत निर्बंध एकदम हटविण्याची घाई करणे चुकीचे ठरेल. परिस्थिती आणखी सुधारेपर्यंत साप्ताहिक संचारबंदी व इतर निर्बंध कायम ठेवायला हवेत, असाही सल्ला बैजल यांनी दिला.

मात्र खासगी कार्यालयांत ५० टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यास नायब राज्यपालांनी तयारी दर्शविली. दरम्यान, बाजारपेठांतील ऑड-इव्हन प्रणाली मागे घेणे व खासगी कार्यालये बंद करण्यासह अन्य निर्बंधही लवकरच हटविण्याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय केला जाईल, असा दिलासाही राज्य सरकारने दिला आहे. प्रजासत्ताक दिनानंतर दिल्लीतील अनेक व्यवहार पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.

ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेचा जोर लवकर ओसरतो हा दक्षिण आफ्रिकेतील अनुभव दिल्लीत येऊ लागला आहे. आरोग्य यंत्रणा सावध आहे तरी निर्बंधाची कठोरता कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

केजरीवाल यांनी बैजल यांच्याकडे पाठविलेल्या शिफारशीतही याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र तिसरी लाट अजून संपलेली नाही याची जाणीव करून देतच निर्बंधांत सूट दिली जाईल, याचा पुनरुच्चार राज्य सरकारने केला आहे.

दिल्लीत रुग्णसंख्येत घसरण

दिल्लीत शुक्रवार सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत १०, ५०० कोरोना रूग्ण आढळले. गुरुवारी हीच संख्या १२.०३६ होती. आज ४३ रुग्णांचा मृत्यू झाला तरी यातील कोरोना रुग्णांची संख्या फक्त ३ होती, असे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. पॉझिटिव्हीटी दरातही दिल्लीत सातत्याने घसरण होत असून सध्या हा दर १७ ते १८ टक्के आहे.

मागील शनिवारी हा दर ३०.६ टक्के होता. त्यानंतर त्यात अनुक्रमे २७.९, २८, २२.५ टक्के असे चढउतार होत राहिले, मात्र रूग्णसंख्या कमी कमी होत चालली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी निर्बंधांत सूट देण्याची शिफारस केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT