Devendra Jhajharia 
देश

Lok Sabha elections 2024 : कोण आहे पॅरा अ‍ॅथलिट देवेंद्र झाझरिया? ज्याला भाजपनी दिली खासदारकीची उमेदवारी

Legendary para athlete Devendra Jhajharia: पद्मभूषण प्राप्त भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांना चुरु मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

Devendra Jhajharia- पद्मभूषण प्राप्त भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांना चुरु मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. भाजपच्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या १९५ जणांच्या पहिल्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने पॅरालिम्पिक खेळाडू झाझरिया यांचा सन्मान केला असल्याचं बोललं जातंय.

पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा अ‍ॅथलिट

पद्मभूषण मिळणारे देवेंद्र हे पहिले पॅरा अ‍ॅथलिट आहेत. झाझरिया यांनी तीन ऑलिम्पिक पदक देशाला मिळवून दिले आहेत. त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांना पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आलाय. झाझरिया राजस्थानचे पहिले खेळाडू आहेत, ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी मागील वर्षी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं. याआधी अथेन्स २००४ आणि रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशासाठी पदक मिळवलं आहे

खेळातील कामगिरीसाठी त्यांना सर्वोच्च असा मेजर ध्यान चंद खेळरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच पद्मश्री पुरस्कार, स्पेशल स्पोर्ट्स अवार्ड (२००४) अर्जुन अवार्ड (२००५), राजस्थान खेल रत्न, महाराणा प्रताप पुरस्कार (२००५), मेवाड फाऊंडेशनचा प्रतिष्ठित अरावली सन्मान (२००९) असे असेन अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळाले आहेत. खेळासंबंधीत अनेक समितीचे ते सदस्य आहेत.

शेतकऱ्याचे पुत्र

देवेंद्र यांचा जन्म राजस्थानमधील चुरुच्या सादूलपूरमध्ये सर्वसाधारण शेतकरी घरात झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामसिंह आणि जीवणी देवी असं आहे. १० जून १९८१ मध्ये त्यांचा जन्म झाला. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेतले. सुरुवातीच्या काळात ते लाकडाचा भाला म्हणून वापर करायचे. १९९५ मध्ये त्यांनी शाळेत असताना भालाफेकला सुरुवात केली. त्यानंतर कॉलेजमध्ये त्यांनी आपली कामगिरी उंचावली.

१९९९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर त्यांनी सुवर्ण पदक जिकलं आणि त्यांनंतर त्यांना ऑलिम्पिक पदकाची स्वप्ने पडू लागली. २००२ मध्ये बुसान एशियाडमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिकलं. २००३ च्या ब्रिटिश ओपन खेळांमध्ये देखील त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली.

२००४ मध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण जिंकलं आणि त्याचं नाव इतिहासात नोंदलं गेलं. त्यानंतर २००६ मध्ये मलेशिया पॅरा एशियन आणि २००७ मध्ये तैवानमध्ये आयोजित वर्ल्ड गेममध्ये देखील त्यांनी सुवर्ण कमाई केली. २०२३ मध्ये फ्रान्समधील अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्यांना सुवर्ण मिळालं.

पीसीआय अध्यक्ष

भारतीय पॅरालिम्पिक समितीची (पीसीआय) नऊ मार्च रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी झाझरिया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या व्यतरिक्त कोणीही अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्यांची अध्यक्ष म्हणून निवड होणे निश्चित आहे. सध्या दीपा मलिक या अध्यक्ष आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Municipal Election 2026 : चंद्रपुरात भाजपा सत्ता राखणार? 'या' प्रभागातील लढतीकडे सर्वाचं लक्ष, प्रतिष्ठा पणाला

Pune Voter Awareness : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये; हडपसर परिसरात 'स्विप'चा जागर!

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या संजनाताई पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT