देश

Loksabha 2019 : भाजपकडून अखेर चिक्कोडीतून अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी

सकाळवृत्तसेवा

चिक्कोडी - भाजपने चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी दिल्याचे आज जाहीर केले. गेल्या पंधरादिवसापासून उमेदवारीबाबत उत्सुकता लागून राहीली होती. जोल्ले यांच्या उमेदवारीने अखेर माजी खासदार रमेश कत्ती यांच्या नावाच्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला.

2004 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता पारंपारीक प्रतिस्पर्धी प्रकाश हुक्केरी व अण्णासाहेब जोल्ले पुन्हा एकमेकांना भिडणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत व विजयाची हमी असलेल्या उमेदवाराची निवड करण्यासाठी कस पणाला लावावा लागला. विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी यांना शह देण्यासाठी अण्णासाहेब जोल्ले हेच समर्थ असल्याचे लक्षात आल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. जोल्ले यांनी यापूर्वी अनेकदा जुन्या सदलगा विधानसभा मतदार संघातून प्रकाश हुक्केरी यांच्याशी लढत दिली आहे. पण त्यांना यश आलेले नाही. मतदार संघ पुनर्रचनेनंतर जोल्ले यांनी चिक्कोडी-सदलगा नव्या विधानसभा मतदार संघाचा नाद सोडून निपाणी मतदार संघ निवडला. शिवाय आपण निवडणूक लढविण्याऐवजी त्यांच्या पत्नी शशिकला जोल्ले यांना पुढे केले. तेथेही एकवेळ हार पत्करल्यानंतर त्यांना यश मिळाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांनी खासदार प्रकाश हुक्केरी यांचे पुत्र गणेश हुक्केरी यांच्या विरोधात चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवुन कडवी झुंज दिली. अवघ्या 12 हजार मताधिक्‍याने गणेश हुक्केरी यांचा यात विजय झाला. त्यामुळे हुक्केरी कुटुंबीयांच्या राजकीय सत्तेला उलथवून टाकण्यासाठी केवळ जोल्ले दांपत्यांनाच शक्‍य असल्याचा संदेश भाजप श्रेष्ठींना वाटते. त्यामुळेच जोल्ले यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याची चर्चा रंगत आहे. 

आता प्रचाराचा धडाका

कॉंग्रेसकडून खासदार प्रकाश हुक्केरी व भाजपकडून अण्णासाहेब जोल्ले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. हुक्‍केरी यांनी मतदार संघ पिंजून काढला आहे. जोल्ले यांनीही आपापल्यापरीने प्रचाराचा जोर वाढवला आहे. प्रतिस्पर्धी निश्‍चित झाल्याने आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT