Mayawati
Mayawati sakal
देश

Mayawati : निवडणूक पटावर ‘हत्ती’ची स्वतंत्र चाल; लोकसभा स्वबळावर लढवणार

पीटीआय

लखनौ - आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी सोमवारी केली. निवडणुकीनंतर आघाडी करण्याची शक्यता मात्र त्यांनी नाकारली नाही. त्याचबरोबर भाजपसह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठविली.

मायावती यांचा आज ६८ वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘बसप’ कोणाशीही युती करणार नाही. आम्ही स्वबळावर लढणार असून कोणालाही मोफत समर्थन देणार नाही, असे मायावतींनी जाहीर केले. निवडणुकीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन एखाद्या पक्षाशी युतीचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ‘आमच्या पक्षाच्या मतदारांची आदर राखणे आवश्‍यक आहे. युती केल्याने पक्षाला फायदा कमी अन तोटाच जास्त होतो. आमच्या मतदानाची टक्केवारीही घटते. मात्र अन्य पक्षांनाच याचा लाभ होतो. म्हणूनच बहुतेक पक्षांना ‘बसप’बरोबर युती करून निवडणूक लढवायची असते.

आमचा पक्ष स्वतंत्र लढून चांगली कामगिरी बजावू शकतो. युती करून ‘बसप’ची सर्व मते आघाडीतील पक्षाकडे जातात. मात्र त्या आघाडीचे मतदान विशेषतः उच्चवर्गीयांची मते ‘बसप’ला मिळत नाहीत.’

‘पक्षाचे कार्यकर्ते १५ जानेवारीला माझा वाढदिवस ‘सार्वजनिक कल्याण दिवस’ म्हणून साजरा करतात. उत्तर प्रदेशात चार वेळा आमचे सरकार असताना आम्ही दलित, मुस्लिम, गरिबांसह समाजातील सर्व वर्गांच्या हितासाठी काम केले आहे. आमच्या सरकारच्या योजनांची नक्कल अन्य पक्षांची सरकारे करीत आहेत, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, मायावती यांनी भाचे आकाश आनंद यांची राजकीय उत्तराधिकारी म्हणून निवड केल्याने त्या राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ते त्यांनी फेटाळले. मी राजकारणात सक्रिय राहणार असून पक्षाला मजबूत मला करण्यासाठी करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.

निमंत्रण मिळाले

मायावती म्हणाल्या, ‘अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मला मिळाले आहे. पण अन्य कामांत व्यग्र असल्याने मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. २२ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाचे मी स्वागत करते. बाबरी मशिदीसंदर्भात भविष्यात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचे मी स्वागत करीन. सर्व धर्मांच्या समानतेच्या विचारसरणीवर माझा विश्‍वास आहे.’

अखिलेश म्हणजे रंग बदलणारा सरडा

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत ‘बसप’बाबतच्या भूमिकेवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरड्यासारखा रंग बदलला, अशी टीका करीत त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन मायवती यांनी केले. ‘‘काँग्रेस, भाजप आणि त्यांचे सर्व सहकारी पक्षांचे विचार भांडवलदार, सरंजामी आणि धर्मांधवादी आहेत.

दलित आणि अति मागासवर्गीय स्वतःच्या पायावर उभे राहत असल्याचे या पक्षांना पाहवत नाही. आरक्षणाचाही पूर्ण लाभ मिळू शकत नाही. सर्व पक्ष आतून एक होऊन साम-दाम-दंड भेदाचा वापर करीत दलितांना सत्तेपासून दूर ठेवत आहे, असा आरोप करीत त्यांच्यापासून दूर राहावे,’ असे मायावती म्हणाल्या.

देशात लवकरच जाहीर होणारी लोकसभा निवडणूक ‘बसप’ दलित, आदिवासी, अति मागास मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या बळावर स्वतंत्रपणे लढेल.

- मायावती, अध्यक्ष, बसप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT