Bagmati Express Derails After Collision With Goods Train, 19 Injured  esakal
देश

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Train Enters Loop Line at 75 km/h, Leading to a Collision Near Kavaraipettai Station: तमिळनाडूमधील कावराईपेट्टई स्थानकाजवळ मैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसचा मालगाडीला धडक बसल्याने 12 ते 13 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 19 प्रवासी जखमी झाले असून, बचावकार्य सुरू आहे.

Sandip Kapde

तमिळनाडूमधील कावराईपेट्टई स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. मैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस आणि एका स्थिर मालगाडीची टक्कर होऊन बागमती एक्स्प्रेसचे 12 ते 13 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 19 प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

माहितीनुसार, बागमती एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12578) मैसूरवरून डिब्रूगडला जात असताना कावराईपेट्टई स्थानकात प्रवेश करत होती. प्रवासादरम्यान, गाडीला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी सिग्नल देण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे ट्रेन मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली आणि 75 किमी प्रति तास वेगाने स्थिर असलेल्या मालगाडीला धडकली. या धडकेमुळे गाडीचे 12-13 डबे रुळावरून घसरले.

मुख्यमंत्री एमके स्टालिनकडून बचाव कार्यावर लक्ष

या दुर्घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी त्वरित मदत कार्य सुरू करण्यासाठी एक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडूचे मंत्री एस.एम. नासर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या टक्करीत सहा डबे रुळावरून घसरले आणि दोन डब्यांना आग लागली. या अपघातात एकूण 19 प्रवासी जखमी झाले, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती.

प्रवाशांसाठी मदतीची व्यवस्था

जखमी झालेल्या तिघांना सरकारी स्टेनली मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी या तिघांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर, उर्वरित 13 जखमी प्रवाशांना पोननेरी सरकारी रुग्णालयात उपचार दिले जात आहेत.

सर्व 1,300 प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. काही प्रवाशांची व्यवस्था लग्न हॉलमध्ये करण्यात आली आहे, जिथे त्यांना अन्न, पाणी आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहेत. रिपोर्टनुसार, सध्या बचावकार्य सुरू असून दुर्घटनेचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT