crime news esakal
देश

Crime News : विमानात फोनवर बोलताना 'बॉम्ब'चा उल्लेख भोवला! महिलेच्या तक्रारीनंतर एकाला अटक

रोहित कणसे

नवी दिल्ली : दुबईला जाणाऱ्या एका व्यक्तीला गुरुवारी (८ जून) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. फोनवर बोलताना बॉम्बचा उल्लेखानंतर शेजारी बसलेल्या सहप्रवासी महिलेने तक्रार केल्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अझीम खान असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील रहिवासी आहे. दुबईला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये बसलेल्या एका महिला सहप्रवाशाच्या तक्रारीवरून दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. महिलेने फ्लाइट क्रू मेंबरकडे तक्रार केली होती की तिने त्या व्यक्तीला फोनवर बॉम्बबद्दल बोलताना ऐकले. या व्यक्तीला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.

नेमकं काय घडलं?

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा प्रवासी विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीहून मुंबईला कनेक्टिंग फ्लाइटने दुबईला जात होता, जे दुपारी ४.५५ वाजता निघणार होते. अधिकाऱ्याने सांगितले की, दुबईला नोकरीसाठी जाणारा प्रवासी आपल्या आईशी फोनवर बोलत होता आणि हे संभाषण त्याच्या शेजारी बसलेल्या एका महिलेने ऐकले, त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली. चेकिंगमुळे, फ्लाइटला पूर्ण दोन तास उशीर झाला आणि काहीही सापडले नाही.

अधिकाऱ्याने सांगितले की प्रवाशी फोनवर त्याच्या आईशी बोलत होता आणि म्हणत होता की, सीआयएसएफने माझ्या बॅगेतून बॉम्ब समजून नारळ काढून टाकला, पण पान मसाला घेऊन जाऊ दिला.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, महिलेने फोनवर बॉम्ब बद्दल ऐकताच तिने ताबडतोब तक्रार केली आणि फ्लाइट क्रूने सीआयएसएफला याची माहिती दिली. यानंतर प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले आणि महिलाही स्वतःच्या इच्छेनुसार विमानातून उतरली. या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण फ्लाईटची कसून चौकशी करण्यात आली मात्र काहीही आढळले नाही. त्या महिला प्रवाशाने त्या विमानात बसण्यास नकार दिला आणि मुंबईचे दुसरे तिकीट बुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT