Mamata Banerjee
Mamata Banerjee esakal
देश

हावडा हिंसाचारावर ममतांचे ट्वीट; भाजपचे पाप जनतेने का भोगावे?

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेला वाद काही केल्या शांत होतांना दिसत नाहीये. शर्मा यांच्या विधानाविरोधात काल देशभरातील विविध भागात आंदोलनं करण्यात आली. यादरम्यान काही ठिकाणी हिसांचाराच्या (Riot) घटना घडल्याने येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. दरम्यान, पश्चिम बंगालमधील हावडा येथे काल उसळलेला हिंसाचाराची धग दुसऱ्या दिवशीदेखील सुरूच असून, या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ट्वीट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Mamta Banerjee Tweet After Hawara Riot)

ममता म्हणाल्या की, हावडामध्ये हिंसक घटना घडत आहेत, त्यामागे काही राजकीय पक्षांचा हात असून, त्यांना दंगल घडवायची आहे, परंतु हे सहन केले जाणार नाही. राज्यातील वातावरण दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सांगत त्यांनी भाजपच्या पापाची फळं जनता का भोगणार? असा सवाल ममता यांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालमधील हावडा येथील पांचाला बाजार येथे शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काही भागात 15 जूनपर्यंत कलम 144 वाढवण्यात आले आहे.

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्याची मागणी

पश्चिम बंगालमधील शुक्रवारच्या हिंसाचारप्रकरणी हावडा पोलिसांनी काल रात्रीपासून आतापर्यंत 70 जणांना अटक केली आहे. दरम्यान, वाढत्या हिंसक घटनांनंतर भाजपचे खासदार आणि पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष सौमित्र खान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याची विनंती केली आहे. याबाबत त्यांनी शहा यांना पत्र लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT