Man In Army Uniform Alleges Torture By Officers Wives Claims Jawans Cook Wash Clothes
Man In Army Uniform Alleges Torture By Officers Wives Claims Jawans Cook Wash Clothes 
देश

Video : जवानांच्या पत्नींना अधिकाऱयांसमोर नाचाव लागतं...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः सीमेवर डोळ्यात तेल घालून मातृभूमीची सेवा करत असताना जवानांच्या पत्नींचा वरिष्ठ अधिकाऱयांकडून छळ होत असून, त्यांच्यासमोर पत्नींना नाचावे लागते, असा आरोप एका जवानाने केला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जवानांना वरिष्ठांकडून त्रास दिला जात असल्याच्या बातम्या यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, एका जवानाने व्हिडिओद्वारे जवानांच्या पत्नींना कसा त्रास दिला जातो, हे सांगितले आहे. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जवानाने गंभीर आरोप केले आहेत.

जवानाने म्हटले आहे की, 'आम्ही सीमेवर तैनात असतो तेंव्हा बळजबरीने आपल्या कुटुंबाला कुटुंब कल्याण केंद्रात ठेवावे लागते. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बायका आमच्या पत्नींना नोकर असल्यासारखी वागणूक देतात. अधिकाऱ्यांकडून आमच्या कुटुंबाचे शोषण केले जाते. त्यांचा अपमान केला जातो. तसेच त्या आमच्या पत्नींना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर नाचायला लावतात आणि त्यांची थट्टा करतात. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून नेहमीच त्यांना चुकीची वागणूक मिळते. कँटीन मधून काही सामान घ्यायचे असेल किंवा आरोग्य तपासणी करताना अपमान केला जातो. लष्कराच्या कपड्यांमध्ये असणाऱ्या आम्हा जवानांना घरातले काम करावे लागतं. एका अधिकाऱ्याच्या घरी 20-25 जवान हे फक्त घरचे काम करण्यासाठी असतात. जवानांना स्वयंपाक करणे, कपडे धुणे, बूट पॉलिश करणे, भांडी घासणे आणि बाजारातून भाजीपाला खरेदी करण्यासारखी कामे करावी लागतात. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पत्नींना सॅल्यूट मारायला लावतात तसेच त्यांचे सर्व  ऐकायला भाग पाडतात.'

दरम्यान, संबंधित व्हिडीओ यावर्षी मे मध्ये सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT