marathi news Belgaum largest countryflag India army
marathi news Belgaum largest countryflag India army  
देश

देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकला 

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज किल्ला तलावाजवळ आज (ता. 12) फडकविण्यात आला. ध्वजाची उंची 110 मीटर असून, देशातील हा सर्वात उंच ध्वज ठरला आहे. एमएसआरसीच्या जवानांनी वाद्य वाजवून देशभक्तीपर गीत म्हटले आहे. यानंतर ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत म्हटले. 

राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी (लिफ्टिंग मशिन्सद्वारे) चालना दिली. एकता आणि अखंडतेचे प्रतिक राष्ट्रध्वज आहे. या स्वरुपाच्या सर्वात उंच ध्वजाची निर्मिती बेळगावात झाली. यामुळे देशाभिमान वाढेल आहे. युवापिढीत देशाप्रती प्रेम निर्माण होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

आपला एकच देश आणि एकच धर्म. जाती, धर्मभेदच्या भिंती आड आणू नये. आपण सारे भारतीय आहोत. त्याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांनी बाळगायला हवा, असे उद्‌गार आमदार फिरोझसेठ यांनी काढले. 

जिल्हाधिकारी झियाउल्ला एस, एमएलआरसी ब्रिगेडियर गोविंद कलवाड, पोलिस आयुक्त डी. सी. राजप्पा, महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, कॅन्टोमेंट सीईओ दिव्या शिवराम, पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, पालिका आयुक्त शशिधर कुरेर, बुडा आयुक्त शकिल अहमद, जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा ऐहोळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT