Representational Image
Representational Image 
देश

..म्हणून 'हिमाचल'ची निवडणूक गुजरातच्या आधी घेतली : निवडणूक आयुक्त 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 'हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये सुरु होणारा हिमवर्षाव हे या राज्यातील विधानसभा निवडणुका लवकर जाहीर करण्यामागील प्रमुख कारण होते', असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार यांनी दिले. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांची तारीख जाहीर करताना गुजरातच्या निवडणुकांची घोषणा न केल्यामुळे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली होती. 

येत्या वर्षअखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांची मुदत संपुष्टात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात केली. पण गुजरात निवडणुकांची घोषणा करणे टाळण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित गुजरात दौऱ्यामुळेच निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली नाही, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त टीकेचे लक्ष्य झाले होते. 

या पार्श्‍वभूमीवर अचलकुमार यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला खास मुलाखत देत भूमिका स्पष्ट केली. 'किन्नौर, लाहौल स्पिती आणि चंबा या ठिकाणी हिमवर्षाव होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि काही राजकीय पक्षांनीही निवडणूक लवकर घेण्याची विनंती केली होती. ही निवडणूक नोव्हेंबरच्या सुरवातीला झाली, तर डोंगराळ भागातील मतदारांना हिमवर्षावाचा अडथळा होणार नाही असाही विचार करण्यात आला', असे अचलकुमार यांनी सांगितले. 

तसेच, हिमाचल प्रदेशमधील निवडणूक निकालांचा गुजरातमधील मतदानावर परिणाम होईल, ही विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली भीती अनाठायी असल्याचे अचलकुमार यांनी सांगितले. 'हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक आधी होत असली, तरीही मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरातमधील निवडणूक त्यापूर्वीच होणार असल्याने या निकालाचा परिणाम होण्याची शक्‍यता नाही. हिमाचल प्रदेशच्या मतमोजणीपूर्वीच गुजरातमध्ये मतदान होईल, अशा पद्धतीने निवडणुकीचे आयोजन केले जाईल, असे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले होते', असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT