fortis hospital
fortis hospital 
देश

मुलीच्या चार तासांच्या उपचारांसाठी वडिलांना एक लाखांचे बिल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चार तासांच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालय प्रशासनाकडून एक लाखांपेक्षा जास्त उपचारांचा खर्च आकारण्यात आला. मात्र, या उपचारादरम्यान 20 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

उत्तर प्रदेशातील मिरुत येथे राहणाऱ्या श्वेता या 20 वर्षीय तरुणीला 21 नोव्हेंबर रोजी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूरोगतज्ज्ञांच्या निरिक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरु होते. यासाठी काही वैद्यकीय चाचण्याही घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर श्वेताला चार तासांसाठी निरिक्षणात ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रूग्णालय प्रशासनाने शेतकरी असलेल्या तिच्या वडिलांना 1 लाख 2 हजार 673 रूपयांचे बिल हाती सोपवले. 

''नोएडातील फोर्टिस रुग्णालयात उपचार घेण्यासाठी श्वेताला दाखल करण्यात आले होते. तिला चार तासांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपचारांचा खर्च म्हणून तिच्या वडिलांना एक लाखांपेक्षा अधिकचे बिल आकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे, याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत'', अशी माहिती गौतम बुद्धनगरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

''फक्त चार तासांच्या उपचारांसाठी रुग्णालय प्रशासनाने एक लाखांचे बिल आकारले आहे. मात्र, माझी मुलगी मरण पावली आहे. मी ते आता भरू शकत नाही. मला आशा आहे, की संबंधित यंत्रणा यावर कडक कारवाई करेल", असे श्वेताचे वडील जुगिंदर सिंग यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT