Rahul-Gandhi
Rahul-Gandhi 
देश

पंतप्रधान मोदी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते : राहुल गांधी

वृत्तसंस्था

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते आहेत. रडताना त्यांना कोणत्याही कॉन्टॅक्ट लेन्सेसची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्यावरूनही सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

गुजरात विधानसभा निवडणूक एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसकडून गुजरातमध्ये जोरदार प्रचार सुरु करण्यात आला आहे. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मतदार असल्याने या भागाला विशेष असे महत्त्व देण्यात आले आहे. 

बुधवारी झालेल्या अमरेली येथील रॅलीमध्ये राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधानांनी भावनिक भाषण करत नोटाबंदीचा निर्णय लागू केला होता. यावेळी ते रडले आणि म्हणाले, जर 31 डिसेंबरपर्यंत काळा पैसा परत आला नाही तर मला भर चौकात फासावर लटकवा. त्यांनी असे वक्तव्य करून चांगला अभिनय केला. ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनय करतात, असे राहुल गांधी म्हणाले. 

एमएसपीच्या मु्द्यावर ते म्हणाले, जेव्हा यूपीए सरकार सत्तेत होते, तेव्हा कापसाला 1200 रुपयांचा दर दिला जात होता. तेव्हा मोदीजी 2000 रुपयांची मागणी करत होते. आज त्यांचे सरकार सत्तेत आहे तरीदेखील कापसाला योग्य दर दिला जात नाही.

दरम्यान, पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षाही उत्तम अभिनेते आहेत, असे वक्तव्य अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांनतर आता राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT