National News Police Attempting Rape 6 year old child
National News Police Attempting Rape 6 year old child 
देश

सहा वर्षीय बालिकेवर पोलिसाचा बलात्काराचा प्रयत्न

वृत्तसंस्था

नोएडा : एका सहा वर्षीय बालिकेवर 48 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलने बलात्काराचा प्रयत्न केला. ही घटना ग्रेटर नोएडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. 

याप्रकरणी पोलिसांनी संशयित नरेंद्र या पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा नरेंद्र हा वर्दीमध्ये होता. त्यामुळे तो पोलिस असल्याचे लक्षात आले. हा प्रकार शनिवारी सकाळी कुलेसरा पोलिस चौकीच्या मागील बाजूस घडला. त्याने पीडित बालिकेला चौकीच्या मागील बाजूस नेत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुलेसरा गावात राहणाऱ्या बालिकेच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि नरेंद्र या पोलिस कर्मचाऱ्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली. 

''याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिस कॉन्स्टेबलला सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. सदर पोलिस कॉन्स्टेबलविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे'', असे पोलिस अधीक्षक सुनिती यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT