National News Shridevi Passes Away Prime Minister Narendra Modi
National News Shridevi Passes Away Prime Minister Narendra Modi  
देश

श्रीदेवी कायम स्मरणात राहतील : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले.

त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूडसह इतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावर शोक व्यक्त केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शोक व्यक्त केला.

''श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच अत्यंत धक्का बसला. त्यांच्या निधनाने हजारो चाहते अत्यंत दु:खी झाले. मूनद्रम पिराई, लम्हे आणि इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगलीच गाजली. त्याचा अभिनय इतर कलाकारांना प्रेरणादायी असेल. मी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतो''.

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

''अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजल्यावर अत्यंत दु:खी झालो. चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विविध भूमिकांमुळे श्रीदेवी कायम स्मरणात राहतील. माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसोबत कायम असतील. श्रीदेवी यांचे अकाली निधन अतिशय धक्कादायक असे आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना''

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान ​

''भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आवडती अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाल्याची बातमी मिळाल्यानंतर धक्का बसला. श्रीदेवी यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रतिभाशाली असे होते. मी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्मास शांती लाभो हीच प्रार्थना''

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

''श्रीदेवी यांच्या निधनामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आपण गमावली आहे''.

-  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

''श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला प्रभावित केले. अत्यंत कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो''.

-  शिवराजसिंग चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

''बहुआयामी व्यक्तिमत्व विशेषत: तेलुगूसाठी श्रीदेवी सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री ठरल्या होत्या. कौशल्यपूर्ण अभिनयाने त्या परिपूर्ण होत्या''.

- चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश

''श्रीदेवी यांच्या निधनाने अत्यंत धक्का बसला. त्यांनी कला क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली. आम्ही सर्वांनी त्यांची क्षमता पडद्यावर पाहिली. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले. मी त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांचे शोक व्यक्त करतो.''

- पीयूष गोयल, केंद्रीयमंत्री

''ही बातमी समजाताच धक्का बसला. आम्ही कधी विचारही केला नव्हता. त्यांनी आपल्या कौशल्याने अनेकांना प्रभावित केले. त्या उत्तम अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रिमध्ये आपले स्थान कायम ठेवले होते. त्यांच्या निधनाने बॉलीवूडचे मोठे नुकसान झाले''.

- हेमा मालिनी, अभिनेत्री आणि खासदार

''ज्या विवाहसमारंभासाठी त्या गेल्या होत्या, मीदेखील तेथे होतो. दुसऱ्या दिवशी मी एका संमेलनात जाण्याचा निर्णय घेतला होता. मला दु:ख होते, की मी हा निर्णय घेतला. तसे नसते केलेतर त्यांच्यासमवेत आणखी काळ घालवण्याचा संधी मिळाली असती''.

- अमरसिंग, माजी समाजवादी नेते

''श्रीदेवी यांचे निधन झाले यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यांनी उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत मोठे योगदान दिले. इंग्लिश-विंग्लिश, लम्हे, मूंद्रम पिराई या चित्रपटातील त्यांची भूमिका कायम लक्षात राहण्यासारखी आहेत. मनापासून शोक व्यक्त करतो''.

- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT